Banana chips Recipe : कच्चा केळीचे पौष्टिक चिप्स घरच्या घरी कसे तयार करायचे?

वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत कच्ची केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Banana chips Recipe
Banana chips RecipeEsakal

केळी हे अनेकांचे आवडते फळ आहे, केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळ हे उत्तम फळ मानले जाते. पण तुम्हाला माहितेय का कच्ची केळी खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत कच्ची केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घ्या यामुळे आरोग्याला कसा फायदा मिळतो.कच्च्या केळ्यामध्ये भरपूर फायबर असते. हे पचनक्रियेसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

कच्ची केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आढळते.कच्ची केळी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कच्ची केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.केळ्यांमध्ये आढळणारे विटामिन बी 7 मधुमेह आणि मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात ग्लुकोज रेग्युलेट करण्यास फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

उपवासाच्या दिवशी पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे चिप्स चिप्समध्येही अनेक पर्याय आढळून येतात. त्यातल्यात्यात सर्वांना आवडणाऱ्या चिप्स म्हणजे  कच्च्या केळीचे पौष्टिक चिप्स. चला तर मग आजच्या लेखात पाहु या कच्चा केळीचे पौष्टिक चिप्स घरच्या घरी कसे तयार करायचे त्याची सविस्तर रेसिपी

Banana chips Recipe
Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे तयार करायचे?

साहित्य 

● सहा कच्ची केळी

● तळण्यासाठी तेलचवीनुसार

● काळं मीठ

● ताजी काळी मिरी

● चवीनुसार चाट मसाल

Banana chips Recipe
Winter Recipe : हिवाळ्यात पारंपरिक पध्दतीने हरभऱ्याची भाजी कशी तयार करायची?

कृती

सर्वप्रथम कच्ची केळी सोलून घ्या.एका भांड्यात थंड पाणी टाका आणि त्यात मीठ घाला.आता त्यात सोललेली केळी 10-12 मिनिटे ठेवा.त्यानंतर चिप कटर वापरा आणि केळ्याचे काप करून घ्या.कापलेले हे तुकडे कागदावर 10 मिनिटं पसरवा.केळ्याचे काप सुकल्यानंतर गरम गरम तेलात तळा. तळलेल्या चिप्सवर वरून काळीमिरी पूड, मीठ घालून सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com