फ्लॉवर की कोबी! कोणती भाजी जास्त पौष्टीक? जाणून घ्या

आरोग्याच्या फायद्यांपासून ते चवीपर्यंत दोन्ही भाज्यात खूप फरक आहेत
कोबी, फ्लॉवर
कोबी, फ्लॉवर

कोबी आणि फ्लॉवर या भाज्या करणं अनेकांना आवडत नाही. एक तर त्यांना स्वत:ची अशी चव नसते. त्यात मटार, बटाटा(Potato) किंवा इतर घटक घातले की त्या भाज्या (Vegetable) खायला चांगल्या लागतात. पण, कोबी आणि फ्लॉवरची तुलना केल्यास, फ्लॉवर ब्रोकोलीसारखा दिसतो. तर कोबी जांभळा, नारंगी आणि हिरवा अशा अनेक रंगात येतो. कोबी आणि फ्लॉवर या क्रूसिफेरस भाज्या आहेत. आरोग्याच्या फायद्यांपासून ते चवीपर्यंत (Food Test) दोन्ही भाज्यात खूप फरक आहेत. ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

कोबी, फ्लॉवर
मेंदू कार्यक्षम होण्यासाठी 'हे' नऊ पदार्थ खा!
Cauliflower
Cauliflower esakal

१) फ्लॉवर खाण्याचे फायदे ( Benefits Of Cauliflower )

ही भाजी नियमित खाल्ल्यास रक्ताभिसरण सुधारते. रक्तवाहिन्यांचे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले होते. फ्लॉवरमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यासाठीही मदत होते. आहारातील फायबरचा फ्लॉवर हा समृद्ध स्त्रोत आहे. शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास तो मदत करतो. त्यात व्हिटॅमिन सी असते, जे कोलेजनच्या उत्पादनासाठी मदत करते. तसेच फ्लॉवर खाल्ल्याने हाडांचे आरोग्य चांगले होते आणि सांध्यांचेही संरक्षण होते. फ्लॉवरची चव मुळात थोडीशी कडू, गोड आणि खमंग असते. जर जास्त शिजवला गेला तर त्याची मूळ चव बदलून तो कडू लागतो.

कोबी, फ्लॉवर
तुमचा डाएट प्लॅन असा आखा! वजन होईल कमी
Cabbage
Cabbagee sakal

२) कोबी खाण्याचे फायदे (Benefits Of Cabbage )

कोबी व्हिटॅमिन सी आणि सल्फरने समृद्ध असते. त्यामुळे आपल्या शरीरातून मुक्त रेडिकल्स आणि यूरिक एसिड सारखे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत मिळते. कोबीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यात कॅलरीज कमी असतात. तसेच कोबी ही रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन उत्पादनासाठी मदत करण्यासाठी ओळखली जाते. कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात. त्यामुळे तो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. कोबीचा पोत खूप कडक आणि कुरकुरीत असतो. कच्च्या कोबीची चव अगदी सहज ओळखली जाते. त्याची चव कडू असते.

कोबी, फ्लॉवर
डाएटिंगसाठी उपयुक्त आहेत 'सहा' पद्धती! जाणून घ्या
SALAD
SALADSakal

दोन्हीपैकी पौष्टीक कोण? (Which Of The More Beneficial?)

कोबी आणि फ्लॉवर या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई आणि इतर अनेक पोषक घटक समप्रमाणात असतात. त्यामुळे दोन्ही पदार्थ एकसारखेच निरोगी आणि पौष्टिक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com