
तुमचा डाएट प्लॅन असा आखा! वजन होईल कमी
आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच फिटनेसकडे खूप लक्ष देणे शक्य नसते. पण ऑफिसचे (Office) काम बसून असते. घरीही बरेचदा बसूनच काम होते. त्यामुळे व्यायाम (Exercise) होतोच असं नाही. अशामुळे वजन वाढते. वजन वाढले (Weight Gain) की मग ते कमी करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होतात. काहीजण वेळ काढून जिममध्ये जातात, डायटिंग (Diet) करतात. मात्र यानंतरही विशेष बदल दिसत नाही. पण, महत्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी योग्य आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट पाळणे फार महत्वाचे मानले जाते. तुम्ही अशाप्रकारे डाएट प्लॅन करू शकता.(Diet Plan For Weight Loss)
हेही वाचा: अंड की पनीर ! वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

Ebreakfast
असा बनवा डाएट चार्ट (How To Make Diet Chart)
सकाळी उठल्यावर- सकाळी उठल्यावर पहिल्यांदा कमीतकमी दोन ग्लास कोमट पाणी प्या. त्यात तुम्ही लिंबू किंवा मधही घालू शकता. जर वाटलं तर साधं पाणी पिऊ शकता.
नाश्ता- सकाळचा नाश्ता दिवसात सगळ्यात महत्वाचा अन्नप्रकार मानला जातो. सकाळी आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत मिळेल. ओट्स, अंडी, सॅलड, ब्रोकोली, उकडलेले बटाटे यासारख्या गोष्टींचा समावेश तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता.
हेही वाचा: वजन कमी करायचंय! 'या' पाच सवयी असतील तर...

Lunch
ब्रंचसाठी- ब्रंचला तुम्ही ग्रीन टी, बदाम, चहा पिऊ शकता. पण चहात साखर न घातला पिण्याचा प्रयत्न करा किंवा साखर कमी घाला. यामुळे चरबी नियंत्रणात राहील.
दुपारचे जेवण- दुपारी पौष्टीक आणि प्रोटीन युक्त आहार खावा. डाळी प्रोटीनने समृद्ध असतात. त्यामुळे जेवणात एक वाटी आमटी, भात, पोळी, भाजी, सॅलेड यांचा समावेश असावा.
हेही वाचा: के पॉप आहार घेतल्याने वजन कसं कमी होईल जाणून घ्या!

स्वीट कॉर्न सूप
संध्याकाळचा नाश्ता- संध्याकाळी भूक लागल्यावर काही लोकं चहाबरोबर तळलेले आणि तिखट पदार्थ खाणे पसंत करतात. पण त्यामुळे वजन वाढते. अशावेळी चहाबरोबर मखाणे, फळं, भाजलेले चणे दाणे आदी पदार्थ खा.
रात्रीचे जेवण- रात्रीच्या जेवणात तेलकट पदार्थ खाऊ नका. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवणात सॅलेड, व्हेज सूप, भाज्या, डाळी यांचा समावेश करा. हे पदार्थ पचायला चांगले असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हेही वाचा: वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी
Web Title: How To Plan Diet Chart From Breakfast To Dinner For Reduce Fat Fast
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..