Chirote Recipe : खायला खुसखूशीत अन् बनवायला एकदम सोपे असे चिरोटे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chirote Recipe

Chirote Recipe : खायला खुसखूशीत अन् बनवायला एकदम सोपे असे चिरोटे!

पूर्वी प्रत्येक घरात सणावाराला चिरोटे आवर्जुन केले जायचे. लग्नात नवरीच्या रूखवतावर शिदोरी भरून ठेवण्यासाठी तर  वेगवेगळया आकारातील चिरोटे केले जायचे. चिरोटे दोन प्रकारे करता येतात. साध्या किंवा पाकातले अशा दोन पद्धतीने केले जातात. यात नववर्षाचे स्वागत गोड करण्यासाठी गोडाचे चिरोटे कसे करायचे हे पाहुयात.

साहित्य 

रवा, मैदा, साखर, तूप, आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग.

कृती 

रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत असल्यास लिंबू पिळावे.

हेही वाचा: Lookback 2022 : बिर्याणी' पुन्हा एकदा टॉपवर, संपूर्ण भारतात ठरली नंबर-1, पाहा स्विगीची लिस्ट

भिजविलेला रवा-मैदा कुटून त्याच्या किंचित जाडसर पोळ्या लाटाव्यात. त्यानंतर एका पोळीला तूप लावून, त्यावर दुसरी पोळी पसरावी व त्यालाही तूप लावावे. नंतर या जोडपोळीची साधारण एक इंच रुंदीची एकावर एक अशी घडी घालून, त्या संपूर्ण घडीचे एक इंच रुंदीचे चौकोनी तुकडे पाडावेत. 

हेही वाचा: Hyderabadi Style Biryani : थर्टी फर्स्ट पार्टीसाठी बनवा खास हैद्राबादी स्टाईल बिर्याणी! एकदम सोपी रेसिपी

हवे असतील त्याप्रमाणे चौकोनी किंवा लांबट लाटून, तुपात तळावेत व साखरेच्या पाकात सोडावेत. नंतर बाहेर काढून उभे करून ठेवावेत. पाक गरमच असावा. या प्रमाणेच सर्व पोळ्यांचे चिरोटे करावेत.

हेही वाचा: KHAVA GAJAR BURFI : नवीन वर्षाच्या स्वागताला घरच्या घरी तयार करा खवा गाजर बर्फी..

टिप्स

- तुपाऐवजी तेल किंवा डालडा वापरले तरी चालेल. पण तुपामुळे चव जास्त खमंग लागते.
-  साखरेचा पाक गोळीबंद करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चीरोट्यात पाक शोषला जावून चिरोटे नरम पडतील.
- मोहनासाठी वापरलेले तूप उकळलेलं असावे. नाहीतर चिरोटे मऊ पडतील.