Lookback 2022 : बिर्याणी' पुन्हा एकदा टॉपवर, संपूर्ण भारतात ठरली नंबर-1, पाहा स्विगीची लिस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lookback 2022

Lookback 2022 : बिर्याणी' पुन्हा एकदा टॉपवर, संपूर्ण भारतात ठरली नंबर-1, पाहा स्विगीची लिस्ट

Lookback 2022 : भारतातील सर्वोत्कृष्ट डिश: सगळ्या देशाला एक करायची ताकद कोणत असेल तर ती जेवणात आहे असं म्हणतात. जेवणाला कोणताही पंथ भाषा प्रादेशिक वाद रोखू शकत नाहीत. भारत हा खवय्यांचा देश आणि यात आपल्या सर्वांची सर्वाधिक लाडकी डिश कोणती असेल तर ती म्हणजे बिर्याणी. भारतातील अनेक राज्यांमध्ये बिर्याणी विकसित झाल्याचा दावा केला जातो . 

हेही वाचा: Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

ही डिश सर्वसामान्य दिवसांपासून ते विशेष कार्यक्रमांपर्यंत प्रत्येकाची भूक भागवते. विशेष बाब म्हणजे ऑनलाइन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy च्या वार्षिक सर्वेक्षणानुसार , भारताने 2022 मध्ये बिर्याणीसाठी सर्वाधिक ऑनलाइन ऑर्डर दिल्या आहेत.

हेही वाचा: Farali Misal Recipe: शुक्रवार उपवासानिमित्त बनवा खास फराळी मिसळ

'How India Swiggy'd 2022' अहवालाने पुन्हा एकदा बिर्याणीच्या साम्राज्यावर शिक्कामोर्तब केले आहे. बिर्याणी ही सलग ७ व्या वर्षी स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश आहे. 2022 मध्ये, दर मिनिटाला 137 बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्या, याचा अर्थ भारतीयांनी दर सेकंदाला 2.28 बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत. 

हेही वाचा: Hyderabadi Style Biryani : थर्टी फर्स्ट पार्टीसाठी बनवा खास हैद्राबादी स्टाईल बिर्याणी! एकदम सोपी रेसिपी

आता पाहूया बिर्याणी सोडून इतर कोणकोणत्या पदार्थांनी भारतीयांना वेड लावलं आहे ते.

दुसऱ्या क्रमांकावर ही डिश2022 मध्ये स्विगीवर सर्वात जास्त ऑर्डर केलेली दुसरी डिश मसाला डोसा आहे. भारतात विशेषतः दक्षिण भारतात डोसा आवडीने खाल्ला जातो यात काही नवीन गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रेंड सुरू आहे की डोसा आपल्या लाडक्या रेस्टॉरंट मधून ऑर्डर करायचा. जर बिर्याणीने भारतीयांना एकत्र केले तर मसाला डोसासाठी भारतीय एकजूट होतात. मसाला डोसा या दक्षिण भारतातील स्वादिष्ट पदार्थाची क्रेझ उत्तर भारतातही दिसून येत आहे. ऑनलाइन ऑर्डरच्या बाबतीत, ही डिश उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये अव्वल क्रमांकाची डिश आहे.

हेही वाचा: New Year Celebration : नवीन वर्षात घरीच बनवा हेल्दी केक, जाणून घ्या खास रेसिपी

लहान शहरांची भूक वाढली

स्विगीचे सीईओ - फूड मार्केटप्लेस, रोहित कपूर यांच्याशी बोलताना म्हणाले की मोठ्या महानगरांमध्ये आणि लहान टियर-2 आणि 3 शहरांमध्ये टेस्टी डिशच्या ऑर्डरमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जपानी खाद्यपदार्थांवर बोलताना ते म्हणाले, "पश्चिम बंगालमधील एका छोट्या शहरात एक सुशी रेस्टॉरंट पाहून मला आश्चर्य वाटले, ज्याचा मुळात अर्थ असा आहे की, अगदी लहान लहान गावातील लोकांची सुद्धा चव आणि पसंतीची भूक वाढली आहे आणि त्यासाठी ते ऑनलाइन ऑर्डरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.