उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे! |Coconut Water Benefits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drinking coconut water every day is beneficial in summer
उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे! |Coconut Water Benefits

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे!

Coconut Water Benefits: उन्हाळा आल्यावर शरीराचे संतुलन राखणे गरजेचे असते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. या काळात लोकं उष्णता कमी करून शरीर डिहायड्रेट ठेवण्यासाठी विविध प्रकारची पेयं पितात. उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाणारे नारळाचे पाणी (Coconut Water) हे आपल्याला हायड्रेट ठेवते. ते शरीरातील विषारी घटक काढून टाकते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच त्यात अँटी-ऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच, त्यात कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे ब्लडप्रेशर आणि हृदयविकारांवरही ते खूप फायदेशीर आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे होत असतात. त्यामुळे नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला ६ प्रकारचे फायदे होऊ शकतात.

हेही वाचा: Summer Tips: उन्हाळा आलाय, या पाच गोष्टींची काळजी घ्या

नारळाचे पाणी (Coconut Water)

नारळाचे पाणी (Coconut Water)

होतात हे फायदे

नारळात भरपूर पोषक घटक असतात- नारळात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे आवश्यक घटक असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. हे एक उत्तम अँटी-ऑक्सिडेंट आहे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती टिकून राहते. तसेच सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून आपले संरक्षण होते.

रक्तदाबासाठी चांगले- नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आपले रक्ताभिसरण - रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते. म्हणूनच ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी नारळ पाणी एक चांगला पर्याय आहे.

हेही वाचा: Skin Tan होतेय! फिकर नॉट! उन्हाळात हे पाच घरगुती उपाय करा

शरीर हायड्रेटेड ठेवते- नारळाच्या पाण्यात फक्त ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. हे पाणी पौष्टिक आणि शुगर फ्री आहे. त्यामुळे तो कोल्ड-ड्रिंक्ससाठी एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

पचन तंत्र सुधारते- दुसऱ्या पोषक तत्वांशिवाय नारळ पाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. तसेच पचनसंस्था सुधारते. आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी नारळाचे पाणी खूप फायदेशीर आहे. तसेच हे पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळी संतुलित राहते, ज्यामुळे चयापचय सुधारते. वजन कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते.

हेही वाचा: उसाचा रस प्या, उन्हाळा सुसह्य करा!

नारळाचं पाणी

नारळाचं पाणी

सांधेदुखीपासून आराम मिळतो- नारळाच्या पाण्यात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे नारळ पाणी प्यायल्याने आपल्या स्नायू आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. त्यामुळे सांधेदुखी कमी होते.

सकाळी राहता फ्रेश- नारळ-पाणी मॉर्निंग सिकनेस आणि थकवा यासारख्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे अनेक प्रकारच्या संशोधनात आढळून आले आहे. म्हणूनच काही तज्ञ गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत नारळाचे पाणी पिण्याची शिफारस करतात. या पाण्यामुळे उलट्यांचा त्रास कमी होते. नारळ-पाण्याद्वारे आपल्या शरीराला इलेक्ट्रोलाइट्सचा चांगल्या प्रमाणात मिळते.

Web Title: Coconut Water Benefits For Health In Summer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top