Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात सामावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diet

Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात सामावेश

Cholesterol कमी करण्यासाठी खालील पदार्थांचा आहारात सामावेश असणं गरजेचं आहे.

१) आहार

आपला योग्या आहार हा आपल्या आरोग्यासाठीचा गुरुमंत्र आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. प्रत्येकजण आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. पण आपण आपल्या आहाराकडे नीट लक्ष दिले पाहिजे. संतुलन आहार हा आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते त्यासाठी आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवायला हवं.

२)ओट्स

ओट्स हे खराब कोलेस्टेरॉल किंवा कमी घनतेच्या लिपोप्रोटीन्सची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. एका अभ्यासानुसार, ओटचा कोलेस्टेरॉल-कमी करणारा प्रभाव त्यात असलेल्या β-ग्लुकनशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यासाठी आहारात ओट्स चा सामावेश असणे महत्त्वाचं आहे.

३) सोयाबीन

सोयाबीन हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि नियंत्रित ठेवण्यास मदत करते. अभ्यासानुसार जर दिवसात २५ ग्रॅम सोयाबीन खाल्ले तर शरीरातील LDL हा ५ ते ६ टक्क्याने कमी होऊ शकतो. असं हार्वर्डच्या संशोधनातून समोर आलंय.

४)संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्य खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते असं संशोधनातून समोर आलंय. धान्य दळून किंवा फोडून केलेल्या पदार्थाच्या तुलनेत संपूर्ण धान्य शरीरासाठी फायद्याचं ठरतं.

५) कडधान्ये

कडधान्ये हा शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, असं कॅनडातील संशोधनातून समोर आलंय. अभ्यासानुसार सहा दिवसांतून एकदा कडधान्य खाल्लाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. यासंदर्भात १०३७ लोकांच्या २६ चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

हेही वाचा: 'आम्ही बंगल्यात चपला सोडल्या', पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर संभाषण व्हायरल

६)वनस्पती तेल

सूर्यफूल तेलासारखे वनस्पती तेल खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. निरोगी आयुष्यासाठी आहारात नेहमी तेलाचा वापर कमी करायला पाहिजे. त्यासाठी उपाय म्हणून वनस्पती तेलाचा वापर करु शकता.

७)फॅटी फिश

आहारात माशांचा सामावेश असणं खूप महत्त्वाचं असतं. Fatty Acid Omega 3 चा मोठा स्त्रोत म्हणून याकडे पाहिलं जातं. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. मटण सुद्धा आपण आहारात वापरु शकतो.

८) भेंडी

भेंडी हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महत्तवाचा पदार्थ मानला जातो. भेंडीमध्ये आढळणारा जाड जेलसारखा पदार्थ हा कोलेस्ट्रॉल शरीरीतून कायमचं काढून टाकण्यासाठी मदत करतो.

९)फळं

सफरचंद आणि द्राक्षे यासारख्या फळांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतो. कारण या फळांमध्ये पेक्टीन चा मुबलक प्रमाणात सामावेश असतो.

१०)स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्स

अभ्यासानुसार, प्लांट स्टेरॉल्स/स्टॅनॉल्सचा वापर कमी घनतेच्या लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉलची पातळी 5-15% ने कमी करतो. म्हणून आहारात याचा सामावेश असणं गरजेच आहे.

११) वांगे

वांगे आहारात असल्याने कोलेस्ट्रॉल कमा होण्यास मदत होते. १०० ग्रॅम वांग्यामध्ये ३ ग्रॅम डायटरी फायबरचा सामावेश असतो.

१२) काजू

काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते.ही फॅट्स कोलेस्टेरॉलशी बांधून ठेवण्यास प्रवृत्त करते आणि शरीरात त्याचे शोषण अवरोधित करते. संतुलित प्रमाणात काजूचा सामावेश आहारात असणं गरजेच आहे.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Web Title: Control Cholesterol Add This Food In Diet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestylefood news
go to top