अभिनेत्री शर्वरी जमेनीसची पाककला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री शर्वरी जमेनीसची पाककला

अभिनेत्री शर्वरी जमेनीसची पाककला

वेगवेगळ्या लोकांनी केलेले पदार्थ मला नेहमीच आवडतात. माझ्या ताईने केलेले सॅलेड, स्टार्टस अप्रतिम असतात. आता मी हे पदार्थ बनवू लागले. मला खायची खुप आवड होती. मात्र, असे पदार्थ बनवायची वा स्वयंपाकाची फारशी आवड नव्हती. मात्र लग्नानंतर मला हे सर्व आवडीने शिकावे लागले. मला लहानपणापासून भात आवडत नव्हता. मात्र पुलाव, बिर्याणी अशा वेगळ्या पद्धतीचा भात बनवला तर मी आवर्जून खाते. पण नुसता आमटी भात कधीच खात नाही.

हेही वाचा: खमंग चवीचा चपाती मलिदा बनवताना 'या' खास घटकांचा वापर करताय?

लग्नानंतर मी व माझे पती निखिल राहात होतो. त्यावेळी मी भात लावायला घेतला तर एखाद्या माणसाने किती फसावे हे समजले. कारण मी कुकरमध्ये भात लावला, पण भांड्यात पाणी टाकले नव्हते. त्यामुळे करपट वास येवू लागला.

लॉकडाउनमुळे स्वयंपाक करायला मावशी येत नव्हत्या. त्या काळात मलाही स्वयंपाक व विविध प्रकारचे पदार्थ करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र पोळ्या भीषण येत होत्या. यानंतर फुलका फुलायला लागला. कोशिंबीर, आमटी, भाज्या फार चांगल्या प्रकारे जमायला लागल्या. यामुळे माझा नवरा व आठ वर्षांचा मुलगा आता कुणाच्याच हातचं जेवण नको, आता तूच बनवं असं सांगतात. ही खरंतर माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लीमेंट आहे.

हेही वाचा: Benefits Of Fish: हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी खात राहा फिश

माझ्या मुलाला माझ्या हातची मटकीची हुसळ व फुलके खुप आवडते. नवराही म्हणतो तुझ्या हातालाच खुप चव आहे. आता मलाही स्वयंपाक आवडू लागला आहे. मी बाहेर प्यानाकोट्टा ही स्वीट डिश खाली होती. आता ती मी घरी बनवायला लागले. यात दुध, साय, साखर, व्हनेला आईस्क्रीम या सगळ्यांनी बनते. या लाकडाउनमध्ये मी नक्कीच चांगला स्वयंपाक करायला शिकले. आता स्वयंपाक बनवायला मावशी आल्या नाहीतरी अर्ध्या ते एक तासात मी स्वयंपाक बनविते.

मी आफ्रिका, चीन, अमेरिका, जपान येथे गेले व तेथील पदार्थांचा आस्वाद घेतला. पण भारतासारखी खाद्य संस्कृती कुठेच पाहायला मिळाली नाही. त्यामुळे मी भारतीय असल्याचा मला नक्कीच अभिमान आहे. मला बाहेरच थाई आणि जापनीज फूड खूप आवडते. आता पुण्यात चिराळू फासे यांचं ओरिजीन्स रेस्टॉरट्समध्ये जापनीज व इंडोनेशियन फूड मिळते. तिथले मोमोझसह सगळेच पदार्थ मला खुप आवडतात. खरंतर स्वयंपाक बनविणं ही एक पाककला आहे आणि ती जमणं हे एक कौशल्य आहे. यामुळे मी सर्व महिलांचे आभार मानते, कारण प्रतेकाच्या हातची चव वेगळी असते अन् तिचा आस्वाद घेण सर्वांनाच आवडते.

अरुण सुर्वे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :salad
loading image
go to top