Food Tips : नवऱ्याला घरंच खायची सवय लावायची असेल तर हॉटेलची ग्रेव्ही बनवा घरच्या घरी!

या टीप्स फॉलो कराल तर तूमचे पती बाहेरच्या जेवणाचं नावही काढणार नाहीत!
Food Tips
Food Tipsesakal

काय करू गं, रात्रीचं जेवण शिल्लक राहण्याला काही प्रमाणच नाहीय. सतत हॉटेलचं खायची सवय लागल्यावर घरचं कसं जाणार? अशी ओरड तूमच्याही घरात सुरू असते का? कारण, प्रत्येकालाच हॉटेलमधील पदार्थांची चव आवडते. त्यामूळेच प्रत्येकाला हॉटेलच्या खाण्याची सवय लागलेली असते.

प्रत्येक घरात ही ओरड असते की हॉटेलमध्ये होणारी चव घरी का होत नाही. त्यामूळेच आता घरीच काही नवा पदार्थ ट्राय करणार असाल तर त्यासाठी हॉटेलसारखी ग्रेव्ही कशी बनवायची याच्या काही टीप्स पाहुयात.(Food Tips : Hotel Gravy at home Recipe and tips)

Food Tips
Amla Chutney Recipe : बदलत्या वातावरणात शरीरासाठी आरोग्यदायी ठरेल ही चटपटीत आवळा चटणी

तूमच्या नवऱ्याला किंवा घरातील कोणत्याही सदस्याची हॉटेलचे खाण्याची सवय मोडायची असेल तर त्याला घरीच हॉटेलची चव देणारे पदार्थ बनवून खायला घालणे हे एवढं सोप्प आहे. त्यामूळेतच घरी कोणताही पदार्थ बनवताना तूम्ही सामान काय वापरणार आहात ते चांगल्याच क्वालिटीचे असेल याची काळजी घ्या. कारण, बऱ्याचवेळा खराब क्वालिटीच्या पदार्थांमूळे जेवणाची चव बिघडते.

Food Tips
LGBTQ Friendly hotels : GF लाच नाही तर BF लाही इथं नेऊ शकता

ग्रेव्हीसाठी टीप्स

- कांदा आणि टोमॅटो पेस्ट फ्राय करतानाच त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकावी. यामूळे ग्रेव्हीला रंग छान येतो.

- हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवून ठेवलेली असते. गरजेनूसार ती वापरली जाते. त्याप्रमाणे तूम्हीही ती बनवून स्टोअर करू शकता.

- आल्यालसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं.

Food Tips
Food Tips : तूम्हीही शिजवण्याआधी चिकन स्वच्छ धुता का?; संशोधकांचा धक्कादायक खुलासा वाचाच!

- ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावे.

- भाजीच्या रश्यात मीठ जास्त पडले तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा. पाच मिनीटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि खारटपणा कमी होतो.

- शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी.

Food Tips
Fresh Mutton : मटण ताजे की शिळे कसे ओळखावे?

- करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनीटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे.

- तूम्हाला फ्राय पनीर आवडत असेल तर ते फ्राय करून पाण्यात घालावे. यामूळे पनीर मऊ होते आणि चव वाढवते.

- ग्रेव्ही बनवताना कांदा पेस्ट न वापरता तो बारीक चिरून मऊ शिजवून घ्यावा. पेस्टला पाणी सुटते त्यामूळे मसाला एकजीव होण्यास वेळ लागतो.

Food Tips
Kitchen Tips : फक्त वीस रुपयात वर्षभरासाठी घरीच बनवा कसुरी मेथी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com