

How to Make Champakali Sweet at Home: Perfect Layers and Recipe Steps
esakal
Authentic Champakali Recipe with Rava & Maida: सध्या बाप्पाच्या आगमनाने घरा-घरात उत्साह पाहायला मिळतोय. रोज नवनवीन चवदार नैवेद्य दाखवण्यासाठी धांदल उडालेली दिसते. मोदकासोबतच आणखी काय नैवेद्य करावा हा प्रश्न पडतो! तर यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'चंपाकळी' हा उत्तम पर्याय आहे.
महाराष्ट्रात पारंपरिक फराळ आणि खास प्रसंगी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये 'चंपाकळी' (Champakali Recipe) या पदार्थाला विशेष पसंती दिली जाते. दिसायला एखाद्या सुंदर फुलासारखी अन् खायला अत्यंत खुसखुशीत असणारी ही चंपाकळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती आहे. कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी चंपाकळी कशी बनवावी, याची सविस्तर रेसिपी खालीलप्रमाणे आहे-