esakal | Crispy Poha Tikki Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा क्रिस्पी पोहा टिक्की
sakal

बोलून बातमी शोधा

Crispy Poha Tikki Recipe food marathi news kolhapur

घरी रोजच पोहे बनविता पण त्या पद्धती पेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण पोहे  बनविण्यास  शिकणार आहोत. ते म्हणजे बेस्ट क्विक  पोहे टिक्की झटपट कसे बनवायचे हे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Crispy Poha Tikki Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा क्रिस्पी पोहा टिक्की

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर :  भारतामध्ये विशेषता सकाळी नाष्टा मध्ये प्रत्येक घरामध्ये पोहे बनवले जातात. प्रत्येकाला सकाळी नाश्ता मध्ये गरम गरम पोह्याची डिश खायला खूप आवडत असते. पोहे हेल्दी आणि पचण्यास हलके असते. पोह्यामुळे आपण खूप वेळ भुकेवर नियंत्रण ठेवू शकतो. याच्याशिवाय ही रेसिपी बनवण्यास खुप सोपी असते. पोह्याची लोकप्रियता देशभर आहे .प्रत्येक ठिकाणी पोहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात.  प्रत्येकाची पद्धत सुध्दा वेगळी असते. तुम्ही घरी रोजच पोहे बनविता पण त्या पद्धती पेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण पोहे  बनविण्यास  शिकणार आहोत. ते म्हणजे बेस्ट क्विक  पोहे टिक्की झटपट कसे बनवायचे हे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


 टिक्की म्हटले की आपल्या डोक्यात येते हा काहीतरी मांसाहारी पदार्थ असेल मात्र हा मांसाहारी पदार्थ नसून पूर्णता शाकाहारी असा पदार्थ आहे. जो काही वेळातच सकाळी नाष्टा साठी तयार होऊ शकतो. आपण पोट भर खाऊ शकतो. ही रेसिपी ब्लॉगर अल्फा मोदी यांनी आपल्या यूट्यूब चैनल वर समथिंग कुकिंग विद अल्फा वर शेअर केली आहे. 

हेही वाचा- काॅम्प्यूटर पेक्षा जास्त चालेल तुमची बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्तीत होईल वाढ ; डायटमध्ये समावेश करा या आठ गोष्टीं

हेल्दी क्रिस्पी पोहा टिक्की रेसिपी कशी बनवाल 

क्रिस्पी पोहा टिक्की या स्पेशल रेसिपीसाठी आपल्याला आपल्या आवडीचा ब्रेड, पोहे आणि काही मसाल्यांच्या आवश्यकता लागेल. साधारणत बाजारामध्ये दोन प्रकारचे पोहे मिळतात. एक म्हणजे पातळ, दुसरे जाड. आम्ही या रेसिपी मध्ये जाडसर पोह्याचा उपयोग करणार आहोत. नरम मुलायम पोहे तयार होण्यासाठी आपण जाड पोहे यामध्ये वापरणार आहोत.

हेही वाचा- गाजराचा ज्यूस मदत करतो पचन संस्था चांगली ठेवण्यासाठी कसा वाचा

साहित्य:

पोहे, ब्रेड ,कोथंबीर, जिरे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, सिमला मिरची, आमसूल पावडर, गाजर, तांदळाचे पीठ इत्यादी

.पोहा टिक्की असे तयार करा
१) पोह्या वरती थोडे थोडे पाणी सोडून पोहे स्वच्छ धुऊन घ्या आणि  काही वेळ  पसरुन ठेवा

२)ब्रेडचे दोन स्लाईस घ्या. ते दहा सेकंद पाण्यामध्ये भिजु द्या. त्यानंतर पाणी पूर्णपणे काढून पोहे आणि ब्रेड दोन्ही एका बाऊलमध्ये मिक्स करून घ्या.

३) आले, लसूण, हिरवी मिरची, शिमला मिरची,  कापलेला कांदा,  गाजर, कोथंबीर, जीरे, आमसूल पावडर, तांदळाचे पीठ घाला.

४) दही घालून  हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.  एकदम नरम पीठ बनवा.

५)एका प्लेटवर पीठ पसरून घ्या आणि रेफ्रिजरेटरमध्ये पाच मिनिट ठेवा.

६) आता धारदार सुरीने बर्फीच्या आकारात चौकोनी किंवा त्रिकोणी,गोल आकार  देऊन  कापून घ्या.
७) गॅसवर एक भांडे गरम करत ठेवा.  त्यामध्ये थोडे तेल घाला.आपण हे शॅलो फ्राय करू शकतो आणि डीप फ्रायही करू शकतो. पण शॅलो फ्राय  हे  आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे थोडे तेल घालून शॅलो फ्राय करुन घ्या.  बर्फीला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या. गरम गरम ही बर्फी एका प्लेटमध्ये ठेवून द्या.ही झाली तुमची पोहा टिक्की तयार. त्याला आता केचप किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.