Sun, Feb 5, 2023

Navratri Recipe: उपवासाला करा टेस्टी दही साबुदाणा
Published on : 27 September 2022, 3:25 am
सध्या नवरात्र सुरू आहे. या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज उपवासाला काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो पण आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे दही साबुदाणा रेसिपी. चला तर जाणून घेऊया.
हेही वाचा: Recipe: रविवारी ट्राय करा टेस्टी अन् खुसखुशीत मटर कचोरी
साहित्य -
साधे दही
साजूक तूप
जिरे
सायीचे दही
हिरव्या मिरच्या (बारीक तुकडे)
शेंगदाण्याचा कूट
कोथिंबीर
साबुदाणा
ताक
मीठ
साखर
हेही वाचा: Navratri Recipe: उपवासाला ट्राय करा टेस्टी बटाट्याची बर्फी
कृती -
ताक टाकून साबुदाणा ३-४ तास भिजवून घ्यावा.
त्यानंतर तुप, जिरे आणि हिरव्या मिरच्याची फोडणी करावी.
ही फोडणी भिजलेल्या साबुदाणावर टाकावी. त्यात शेंगदाण्याचा कुट, मीठ आणि साखर टाकावी.
त्यात दही घालावे आणि सर्व एकत्र मिक्स करावे.