

Dinkachi Peya, The Traditional Ayurvedic Drink Keeps You Strong and Warm in Winter
Sakal
Maharashtrian Dink Pej recipe for energy: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अगदी तरुण वयातही अनेकांना गुडघे दुखणे, कंबरदुखी, अंगात कणकण राहणे, वारंवार सर्दी होणे किंवा सकाळी उठताना शरीर जड वाटणे असे त्रास जाणवू लागले आहेत.
बहुतेक वेळा हे सगळे वाढत्या वयाशी जोडले जाते, पण आयुर्वेदाच्या मते शरीरातील वात वाढणे, कॅल्शियमची कमतरता, पचनशक्ती कमकुवत होणे किंवा मेनोपॉजनंतर येणारी कमजोरी ही यामागची खरी कारणे असू शकतात. विशेषतः महिलांमध्ये पाठदुखी आणि थंडीचे आजार आता फारच सामान्य झाले आहेत.