Easy Recipe : कांदा आणि लसूण शिवाय बनवा काश्मीरी दम आलू 

Easy Recipe Kashmiri Dum Aloo tips food marathi news
Easy Recipe Kashmiri Dum Aloo tips food marathi news

कोल्हापूर : चैत्र वैशाख जवळ आला की बरेच लोक कांदा आणि लसूण हा शिवाय  पदार्थ बनवतात. त्यामध्ये काश्मीरी दम आलूचा  देखील समावेश आहे . साधारण कश्मीरी दम  आलूत मसाले लागतात. ही खूप वेगळी रेसीपी असते.  चैत्र नवरात्र सुरू होण्यापूर्वी बरेचसे लोक कांदा लसूण वर्ज्य करतात अशा वेळेस मग काहीतरी चटपट खायची इच्छा होते. या काळामध्ये काश्मिरी दम आलू हा बेस्ट पर्याय तुमच्यासाठी असू शकतो तर पा पदार् थस्वादिष्ट कशा पद्धतीने  बनवावा हे जाणून घेऊया.

साहित्य:
 
अर्धा किलो बेबी पोटॅटो
एक कप दही,
तीन चमचा काश्मिरी मिरची पावडर,
पाव कप मोहरीचे तेल
,हिंग एक चिमट,
एक दालचिनी,दोन लवंग,
एक मोठे वेलदोडे,काळी मिरचीच्या बिया
 एक चमचा, जिरा, वाळलेल्या आल्याची पावडर,
मीठ चवीनुसार


कृती

सगळ्यात पहिल्यांदा  लहान बटाट्यांना स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्याला वीस ते तीस मिनिटं पाण्यामध्ये ठेवून द्या. पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून उकडून घ्या .ते पूर्णपणे शिजलेले नसावेत‌. नऊ ते दहा मिनिटांमध्ये शिजवून घ्या.जर कुकरमध्ये बटाटे लावायचे असतील तर एकच शिट्टी होऊ पर्यंत शिजवून घ्या.

स्टेप 2

आता उकडलेल्या बटाटा मध्ये टुथपिकने छिद़ पाढून घ्या.  त्यामध्ये मोहरीतेल घालून फ्राय करून घ्या.

टिप्स 3
एका बाजूला बाउल मध्ये दही फेटून घ्या आणि दुसरीकडे  लाल मिरची पावडर दोन चमचे, पाणी घालून मिक्स करा आणि स्मूद पेस्ट बनवा

स्टेप्स4

पाण्यामध्ये दोन चमचे तेल घाला आणि त्यामध्ये हिंग टाका नंतर  तयार केलेली पेस्ट घाला. हळुवारपणे गॅस पासून बाजूला घ्या नाहीतर जळण्याची शक्यता असते.यामुळे तेल टाकल्यानंतर लगेच बाजूला घ्या

स्टेप्स 5

आता यामध्ये फेटलेले दही घाला दही घालत असताना गॅस बारीक करून थोडं थोडं घालून ते दही चमच्याने मिक्स करताना त्यात थोडे थोडे त्यामध्ये पाणी घाला झाला त्यानंतर मोठी वेलची, दालचिनी, जिरे मसाला,  मसाला पान टाकून मिक्स करून घ्या

स्टेप्स 6
आता यामध्ये फ्राय केलेले बटाटा टाका. एक लक्षात घ्या की भाजी थोडीशी जाडसर होण्यासाठी गॅसचा स्पीड तोडा कमी ठेवा.

 स्टेप्स 7
आता यामध्ये थोडेसे मीठ घाला आणि आठ ते दहा मिनिटात शिजवत ठेवा. थोडे जाडसर झाल्यानंतर राईस किंवा रोटी सोवत खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com