
Nepalese Jhol Momo Recipe
sakal
Nepalese Jhol Momo: सध्या बहुतांश लोकांना मोमो हा पदार्थ अतिशय प्रिय आहे. व्हेज मोमो, नॉन-व्हेज मोमो, स्टिम्ड मोमो, फ्राईड मोमो, तंदुर मोमो आणि तुम्ही जे नाव घ्याल त्या प्रकारचे मोमो बाजारात मिळतात. पण तुम्ही कधी झोल मोमो ऐकले आहेत का? नसेल ऐकले तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच. तुम्हाला जर झणझणीत तिखट, आंबट अशा चवीचे पदार्थ खायला आवडत असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
झोल मोमो ही पारंपारिक नेपाळी डीश आहे, जी नेहमीच्या मोमोपेक्षा आणि वेगळी आणि स्वादिष्ट देखील आहे. त्यासोबत दिला जाणारा झोल आचार हा आंबट, तिखट आणि नटी (nutty) चवीचा विशेष सॉस असतो. आणि त्यापासूनच बनते झोल सूप जे प्रामुख्याने स्टिम्ड मोमोसोबत सर्व्ह केले जाते. चला तर मग ही तोंडाला पाणी सुटणारी डीश कशी बनवायची ते पाहूया.