Food In Pregnancy : गरोदरपणात ड्रायफ्रूट्स खाणं धोक्याच तर नाही ना.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food In Pregnancy

Food In Pregnancy : गरोदरपणात ड्रायफ्रूट्स खाणं धोक्याच तर नाही ना...

Food In Pregnancy : गरोदरपणात काय खाव काय खाऊ नये असे अनेक प्रश्न मनात असतात; शिवाय घरातले मोठे जाणकार आणि बाकीही लोकं खूप काही नियम सांगत असतात, या सगळ्यात गोंधळायला होतच असेल; शिवाय आपल्या शरीरासाठी आपल्या बाळासाठी काय महत्वाचं आहे हेही लक्षात येत नसेलच; असाच एक प्रश्न असतो तो ड्राय फ्रूट अर्थात सुका मेवा खाण्याबद्दल..

हेही वाचा: Pregnancy Healthy Foods: गरोदरपणात हे अन्नपदार्थ आरोग्यासाठी असतात सकस

गरोदरपणात स्त्रीला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चालण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्याचीच काळजी घ्यावी लागते. थोड्याशा निष्काळजीपणाचाही आई आणि मुलाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होवू शकतो.

हेही वाचा: Pregnancy Health Tips : गर्भावस्थेत ग्रीन-टी घेतल्याने होते का वेळेआधी प्रसुती? जाणून घ्या तोटे

त्यामुळे गर्भावस्थेतील बाळाची हालचाल लक्षात येण्यासाठी नियमित गर्भधारणेची तपासणी केली जाते. गरोदरपणात महिलांना घरातील सदस्यांकडून खाण्यापिण्याबाबत अनेक सल्ले मिळतात, त्यापैकी एक म्हणजे सुक्या मेव्याच्या सेवनाबाबत.गरोदरपणात सुका मेवा खाणे सुरक्षित आहे का?

हेही वाचा: Pregnancy : गरोदर असल्याचे कळल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महिलेने दिला बाळाला जन्म

गरोदरपणात ड्रायफ्रूट्स खाणे आवश्यक आहे. पण कोणते ड्रायफ्रूट किती प्रमाणात खावे याची माहिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता. कारण जास्त प्रमाणात सुका मेवा खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: Pregnancy : तिशीनंतर गर्भारपण स्वीकारताना ही काळजी घ्या

सुकामेव्यामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अमिनो अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक आणि सेलेनियम असतात, जे गर्भवती महिलेसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यात व्हिटॅमिन B1, B9, C, K, E आणि H असतात.

हेही वाचा: Pregnancy Tips : गर्भावस्तेत वजन कमी करणं योग्य की अयोग्य?

गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहते, त्यामुळे ड्रायफ्रुट्समध्ये आढळणारे आहारातील फायबर ही समस्या टाळते. गरोदरपणात आयरन खूप महत्वाचे आहे, म्हणून तुम्ही तुमच्या आहारात अंजीर आणि खजूर यांचा समावेश केला पाहिजे.

हेही वाचा: Pregnancy Tips : गर्भावस्तेत वजन कमी करणं योग्य की अयोग्य?

सुक्या मेव्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए पोटातल्या बाळाच्या दात आणि हाडांसाठी खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर सुक्या मेव्यामध्ये आढळणारे पोटॅशियम ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यास मदत करते. त्याच वेळी, मॅग्नेशियम बाळाच्या मज्जातंतू आणि हाडांच्या विकासात मदत करण्यासाठी कार्य करते.रोज रात्री पाच बदाम आणि मनुके भिजत घालून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने खूप फायदा होतो.

हेही वाचा: Fasting During Pregnancy: गर्भावस्थेत नवरात्रीचे व्रत करायचे? मग 'या' गोष्टी विशेष लक्षात ठेवा

Disclaimer : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.