Cutlet Recipe: टेस्टी अन् हेल्दी कटलेट्स खा, पहा सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cutlet Recipe

Cutlet Recipe: टेस्टी अन् हेल्दी कटलेट्स खा, पहा सोपी रेसिपी

सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे मुलांसाठी दररोज काय स्पेशल करावं हा नेमका प्रश्न निर्माण होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया टेस्टी असे कटलेट्स कसे करायचे?

साहित्य -

 • तयार भात

 • सुक्या मटरची चटणी

 • कांदे

 • हिरव्या मिरच्या

 • रवा

 • चणा दाळ पीठ

 • मीठ

 • ब्रेडचे स्लाईस

 • वाफवलेली कोबी

 • आले

हेही वाचा: Badam Halwa Recipe: भाऊबीजेला करा टेस्टी बदामाचा शिरा, पहा सोपी रेसिपी

कृती

 • सुरवातीला आले आणि हिरव्या मिरच्या बारिक चिरुन घ्याव्या.

 • कांदा बारीक चिरुन तेलावर परतून घ्या

 • हिरव्या मिरच्या, आले आणि परतून घेतलेले तेलात रवा टाकावा आणि सर्व साहित्य मिश्रण (तयार भात, सुक्या मटरची चटणी, चणा दाळ पीठ, ब्रेडचे स्लाईस, वाफवलेली कोबी) एकत्र करावे. पिठाचा गोळा करावा

 • गोळा चपटा करावा आणि त्यावर थोडा वर रवा घालावा आणि तेलातून का़ढावेत

 • तांबूस रंग येईपर्यंत तळावे. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत हे कटलेट्स खाऊ शकता.