
चहा तोही फळांचा! चिकू, सफरचंद, केळी घातलेला चहा होतोय Viral
चहा अनेकांना आवडतो. कुठलाही सिझन असला तरी लोकं चहा पिणे काही कमी करत नाहीत. म्हणूनच तर लोकं आल्याचा चहा, वेलची चहा, मसाला चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी असे विविध चहाचे प्रकार आवडीने पितात. चहा आवडतो म्हणून काय काहीही प्यायचं का? सध्या सोशल मिडीयावर असाच चहा व्हायरल होतो आहे. हा चहा आहे फळांचा. हा चहा पाहून अशाप्रकारच्या विचित्र पदार्थ करणाऱ्या लोकांवर वेसण घालण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एका युझरने केली आहे. (weird food combination)
हेही वाचा: Viral : दोन जणींना एकाच व्यक्तीशी करायचंय लग्न, बोला काय करायचं?
सुरतमधील एका चहाविक्रेत्याच्या स्टॉलवरील हा व्हिडिओ आहे. foodie_incarnate या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चहाचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओनुसार, चहावाला एका भांड्यात दूध गरम करतो. त्यात पाणी, चहा पावडर टाकतो. त्यानंतर त्यात केळी, चिकू आणि सफरचंद कापून टाकतो. त्यानंतर हा चहा तो गाळून एका कपात प्यायला देतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच वैतागले आहेत. गेल्या १० वर्षांपासून सुरतमध्ये हा चहा तयार होतो आहे.
हेही वाचा: माठातून पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे! आयुर्वेदानुसार महत्व वाचा!
Web Title: Fruit Tea Video Viral Of Surat Tea Lover Angry After Watching Weird Food Combination Bsg84
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..