esakal | Ganesh Chaturthi Special Recipe 'गौराई'च्या शिदोरीसाठी लागणारी आळूच्या वडीची खास रेसिपी; जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

'गौराई'च्या शिदोरीसाठी लागणारी आळूच्या वडीची खास रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसात रानात सापडणाऱ्या आळूच्या पानांमुळे या सणात ही वडी आणि भाकरी विषेश पदार्थ म्हणून खाल्ली जाते.

'गौराई'च्या शिदोरीसाठी लागणारी आळूच्या वडीची खास रेसिपी

sakal_logo
By
स्नेहल कदम

आळूच्या पानाची वडी म्हणजे तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मंडळी आळूच्या वडीवर ताव मारताना दिसतात. (Ganesh Chaturthi 2021) गरमागरम ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत आळूची वडी खाण्यास अनेकजण पसंती देतात. गणेशोत्सवाला आळूच्या वडीला विशेष महत्व असते. (Ganesh Chaturthi 2021) गौरी आवाहनच्या दिवशी नैवद्यासाठी वडीचा वापर केला जातो. ग्रामीण भागाच ही परंपरा आजही पहायला मिळते. पावसाळ्याच्या दिवसात रानात सापडणाऱ्या आळूच्या पानांमुळे या सणात ही वडी आणि भाकरी विषेश पदार्थ म्हणून खाल्ली जाते. (Ganesh Chaturthi Shubh Muhurat) गौरीच्या आगमणाचा सोहळा म्हणून शिवाय तिची शिदोरी म्हणून ही वडी आणि तांदळाची भाकरी-भाजी एकमेकांच्या घरी वाटली जाते. (Aaluchi Vadi Receipe) गौराई माहेरी आली आहे, तिला ही भाजी-भाकरी आवडते म्हणून हे खास पदार्थ बनवला जातो. ही रेसिपी आपण आज जाणून घेणार आहोत..

हेही वाचा: Kaju Pista Recipe :असा बनवा घरच्या घरी काजू, पिस्ता रोल

साहित्य -

  • आळूची पाने - ५ ते ७

  • लाल तिखट - २ चमचे

  • कोरट्याची चिटणी - ४ चमचे (कारळा/कोरटी)

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • बेसण पीठ - ४ वाटी

  • सोडा - आवश्यकतेनुसार

हेही वाचा: झटपट तयार होणारा 'हा' लोकप्रिय पदार्थ, वाचा रेसिपी

कृती -

सुरुवातील बाजारातून किंवा रानातून आणलेली आळूची पाने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर बेसण पिठात आवश्यकतेनुसार हळद, मीठ, लाल तिखट, सोडा घालून मिश्रण एकत्र करावे. यात थोडे पाणी घालून याचे सैलसर, हलके पीठ तयार करुन घ्यावे. आता आळूची पाने उलटी करून पाठीमागच्या बाजूला हे मिश्रण लावून ते पसरवावे. हलक्या हातांनी त्या पानाचा रोल करावा आणि मोदक पात्राच्या चाळणीत ठेवावे. अशी एका वेळी तुम्ही चार पाने एकत्र ठेऊ शकता. यानंतर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाणी उकळ्यानंतर त्यावर ही चार ते पाच तयार पाने ठेवावी. भांड्यावर ठेवलेली बेसणाची ही पाने वाफवून घ्यावी. १० मिनीटांनी हे मिश्रण शिजलेले दिसेल. चाळण खाली उतरवून त्या शिजलेल्या रोलचे सुरीच्या सहाय्याने वडीप्रमाणे तुकडे करुन घ्यावे. कढईत तेल गरम करुन घ्यावे. तेलात या वड्या खरपूस तळून घ्याव्या. तळलेल्या वड्यांवर कोरट्याची चटणी टावावी. गरमा गरम, खमंग आळूची वडी खाण्यास तयार आहे. तुम्ही ही भाकरी सोबत खाऊ शकता.

loading image
go to top