Happy Children’s Day : बाल दिनानिमित्त बनवा ह्या खास 5 रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy Children’s Day

Happy Children’s Day : बाल दिनानिमित्त बनवा ह्या खास 5 रेसिपी

Happy Children’s Day : दरवर्षी 14 नोव्हेंबरला आपण चाचा नेहरू अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिन साजरा करतो. यावर्षी तुम्ही तुमच्या मुलांच्या मित्रांनाही घरी बोलवून एक छोटीशी पार्टी करू शकतात आणि यातच मेन्यू म्हणून या पाच डिशेस ठेवू शकतात.

हेही वाचा: Children's Day: आपल्या घरातील लहान मुलांना 'या' गोष्टी करा गिफ्ट

व्हाईट सॉस पास्ता - पास्ता ही एक इटालियन डिश आहे, वेगवेगळ्या सॉसमध्ये पास्ता बनवता येतो. पण मुलांना व्हाईट सॉस मध्ये बनवलेला पास्ता खूप आवडतो. ही एक टेस्टी आणि क्रीमी रेसिपी आहे. फ्रेश क्रीममध्ये बेबी कॉर्न आणि मशरूम घालून हा अजून छान लागतो.

हेही वाचा: Children's Day: मुलांसोबत साजरा करा बालदिवस; द्या एकापेक्षा एक हटके शुभेच्छा

चॉकलेट ब्राउनी - लहान मुलांना तर चॉकलेट खायला कारण हवं; अशात तुम्ही त्यांना चॉकलेट ब्राऊनी बनवून खाऊ घालू शकता. ही बनवायला सोपी आणि मुळात ५-७ मिनिटांत तयार होते. ही ब्राउनी रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त कोको पावडर, दूध, दही, क्रिम, पिठी साखर,व्हॅनिला इसेन्स आणि ड्राय फ्रूट लागतील.

हेही वाचा: Children’s Day : मुलांना टीव्ही,मोबाईलपासून दूर करायचंय? खरेदी करा 'ही' इंटरेस्टिंग पॉपअप पुस्तकं

चॉकलेट चिप आइस्क्रीम - आपल्या रेग्युलर चॉकलेट आइस्क्रीम वर जरासे चोको चिप्स घालून ही रेसिपी पटकन बनवता येईल. चॉकलेट चिप आइस्क्रीम ही दूध, ब्राऊन शुगर, चॉकलेट, अंडी, व्हॅनिला इसेन्स, हेवी क्रीम, चॉकलेट कुकीज आणि चॉकलेट चिप्स वापरून बनवलेली कॉन्टिनेंटल रेसिपी आहे आणि बहुदा मुलांहूनही जास्त तुम्हाला आवडणारी देखील.

हेही वाचा: Pune childrens day : पुण्यात 1800 विद्यार्थी चालत जाऊन बालदिन करणार साजरा

चीझी पोटेटो व्हेजेस - चीझी पोटेटो व्हेजेस ही एक टेस्टी डिश आहे. हे बटाटे, चीझ, फ्रेश क्रीम, कांदे, सॉस, ओरेगनो आणि चीली फ्लेक्स वापरून तयार करतात. ही फिंगर फूड रेसिपी घरात प्रत्येकाला आवडेल.

हेही वाचा: Children’s Day 2021: पालकांनो, मुलांना द्या ही गिफ्ट्स

व्हेज स्प्रिंग रोल्स - व्हेज स्प्रिंग रोल्स ही खूप जास्त आवडणारी चायनीज रेसिपी आहे. स्टफिंग म्हणून ताज्या भाज्या घालून हे रोल्स तुम्ही घालू शकतत. आणि अर्थात यात आपली मुल न खाणाऱ्या काही भाजाही सहज लपवून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात.