

Why Eating Bhakri Daily Is Great for Your Health
sakal
Why Should We Eat Bhakri: ज्वारी, बाजरी, नाचणी ही भाकरी वर्गातील धान्ये. क्षार व चोथा यांनी परिपूर्ण आहेत. त्यामुळे समतोल आहार नियोजनामध्ये भाकरीचा समावेश असणे आवश्यक आहे. भाकरी बनवण्याची पद्धत व त्यात असलेला भरपूर चोथा, या दोन गोष्टींमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, गाऊट व स्थौल्य या विकारांमध्ये हा पदार्थ अतिशय फायदेशीर ठरतो. भाकरी बनवताना एक थेंबही तेल तुपाचा वापर करावा लागत नाही, त्यामुळे कॅलरीज बाबत सतर्क असणाऱ्यांनी ही पर्वणीच समजावी. भाकरीमध्ये भरपूर चोथा असल्याने पोट भरल्याची जाणीव लवकर होते व जास्त काळ टिकते. वेट लॉस डाएटमध्ये भाकरीचा समावेश जरूर करावा.