
Besan Chilla : या नाश्त्याने तुमचं पोटही भरेल अन् सेहतही बनेल, लगेच नोट करा बेसन चिला रेसिपी
Besan Chilla Recipe : सकाळ होतात आज नाश्त्याला वेगळं काय बनवू असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच. त्यातच जीभेचे चोचले पुरवणारा चमचमीत पण आरोग्याला जपणारा नाश्ताही बनवायचा असतो. या सगळ्यांचा ताळमेळ घालत गृहिणी सकाळचा नाश्ता तयार करत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याने तुमचंह पोटही भरेल आणि आरोग्य देखील अगदी फिट राहील. ही रेसिपी आहे बेसन चिला रेसिपी.
या रेसिपीसाठी कोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते जाणून घेऊया
बेसन
ओवा
लाल तिखट
काळी मिरी पावडर
धने पावडर
हळद
मीठ
चिरलेला कांदा, टॉमेटो, मिरची
कोथिंबीर
पाणी
तेल
बेसन चिला बनवण्याची रेसिपी
बेसन चिला अर्थात पोळा बनवण्याची पद्धत
Step 1: वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठात गुठळी राहणार नाही अशा तऱ्हेने पाण्याचा वापर करून भिजवून घ्या.
Step 2: अति जाड अथवा अति पातळ भिजवू नका.
Step 3: तव्यावर तेल सोडून त्यावर हे मिश्रण घाला आणि वरून झाकण ठेवून शिजू द्या. गरमागरम चिला तयार. सॉसबरोबर खायला द्या. (Healthy Breakfast)