दूध, दही, फळे खा! कोरोनाला लांब ठेवा

योग्य संतुलित आहार, व्यायामाने संसर्गाची तीव्रता होते कमी
दूध, दही, फळे खा! कोरोनाला लांब ठेवा

कोल्हापूर : 'शरीर स्वस्थ तर कोरोना फस्त' असे म्हणत कोरोनाविरुद्ध शरीर सदृढ करण्याची वेळ आली आहे. रोजच्या आहारात दूध, दही, पालेभाज्या, फळे खाऊन कोरोनाची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते. यामुळे योग्य व्यायाम आणि आहाराचे नियोजन करून कोरोनाच्या लढ्यात एक पाऊल पुढे राहणे शक्‍य होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वकाही ठप्प होत आहे. जीव वाचवणे प्रत्येकाला महत्त्वाचे आहे. यामुळेच प्रत्येकानेच योग्य संतुलित आहार आणि आवश्‍यक व्यायामाची वेळ आली आहे. यासाठी रोजच्या आहारातील पदार्थ योग्यरित्या वापरून आपण अधिक सशक्त होऊ शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या दूध, दही, ताक याचे सेवन हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. यात असणारे 'कॅल्शियम' हे 'व्हिटॅमिन डी' शी संयोग करून शरीराला बळकटी देते. आहारासोबतच शरीरातून घाम निघेपर्यंत व्यायाम करणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. योगाची काही आसने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यास अधिक महत्त्वाची ठरतात. हे करताना साडेआठ ते साडेनऊ या वेळेच्या उन्हात किमान दहा मिनिटे घालवल्याने 'डी व्हिटॅमिन' मिळते. हा सर्व प्रकार शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सुदृढ राहण्यास मदत होते.

दृष्टिक्षेप...

  • फळांच्या रसापेक्षा फळे खाणे फायदेशीर

  • संत्रे, मोसंबी, आवळा, लिंबू खाण्याने 'व्हिटॅमिन सी'चे शरीरात योग्य संतुलन

  • पालेभाज्या खाल्ल्याने अथवा भाज्यांचा रस सेवनाचा सर्वाधिक फायदा

  • सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम पर्याय

"योग्य आहार आणि व्यायाम हा कोणत्याही स्वरूपाच्या आजारात लवकर बरे होण्यास मदत करतो. शिवाय व्हिटॅमिन आणि कॅल्शियमसारखे घटक हे औषधाच्या रूपाने खाण्यापेक्षा निसर्गतः उपलब्ध घटकांतून घेण्याचे सर्वाधिक फायदे आहेत."

- प्रज्वला लाड, आहारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com