Chole For Weight loss- वजन कमी करायचंय? मग Diet मध्ये आजच सामील करा प्रोटीनयुक्त छोले, या रेसिपी करा ट्राय

वजन कमी कऱण्यासाठी प्रोटीनयुक्त Protin आणि हाय फायबर पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. यामुळे जास्त वेळ पोट भरलेलं राहतं परिणामी वारंवार भूक लागत नाही आणि वजन झपाट्याने कमी होतं. यासाठीच आज आम्ही तुमच्या सोबत छोले म्हणजेच काबुली चण्यांच्या काही खास रेसिपी शेअर करणार आहोत
छोल्यांची रेसिपी
छोल्यांची रेसिपीEsakal

वाढतं वजन ही अलिकडे एक मोठी समस्या ठरली आहे. वजन घटवण्यासाठी योग्य आहार आणि व्य़ायाम गरजेचा आहे. वजन कमी करण्यासाठी Weight Loss अनेकजण विविध डाएट फॉलो करत असतात. Healthy Diet Marathi Tips Try these chole Recipes

वजन कमी करण्याठी डाएट Diet करायचं म्हणजे केवळ उकडलेला, बेचव असा आहार घ्यायचा असा अनेकांचा समज होतो आणि मग डाएट सुरू होण्यापूर्वीच त्याकडे पाठ फिरवली जाते. डाएटमध्ये Diet असे पदार्थ असावे जे चवीलाही Taste रुचकर असतील आणि पौष्टिकही असतील. तसंच ते झटपट तयार होणारे असावेत अशी अनेकांची इच्छा असते. असे पदार्थ असतील तर योग्य पद्धतीने डाएट फॉलो होवून वजन कमी करण्यास Weight Loss मदत होईल.

हे देखिल वाचा-

छोल्यांची रेसिपी
Recipe : मसालेदार छोले मटर कुलचे; घरीच बनवण्यासाठी सोपी रेसिपी

वजन कमी कऱण्यासाठी प्रोटीनयुक्त Protin आणि हाय फायबर पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. यामुळे जास्त वेळ पोट भरलेलं राहतं परिणामी वारंवार भूक लागत नाही आणि वजन झपाट्याने कमी होतं. यासाठीच आज आम्ही तुमच्या सोबत छोले म्हणजेच काबुली चण्यांच्या काही खास रेसिपी शेअर करणार आहोत.

काबुली चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर Fiber उपलब्ध असतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आम्ही सांगणार आहोत काही काबुली चण्याच्या म्हणजेच छोल्याच्या काही टेस्टी रेसिपी......

मशरुम पालक चणा ऑमलेट

चण्याचं ऑमलेट हा वजन कमी करण्यासाठी एक टेस्टी आणि हेल्दी पर्याय आहे. यात अंड नसलं तरी याची चव मात्र ऑमलेट प्रमाणेच लागते. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

साहित्य- १ कप चण्याचं पीठ, पाणी, १ चमचा आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, ओवा, मीठ चवीनुसार, बेकिंग पावडर, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, अर्धा वाटी बारीक चेरलीला पालक, अर्धा वाटी बारीक चिरलेला मशरुम, काजू चीज (पर्यायी)

कृती-

सर्वप्रथम एका बाउलमध्ये चण्याचं पीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, हळद, लाल मिरची पावडर, १ चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाका. यात पाणी घालून चांगलं मिश्रण एकजीव करून घ्या.

गॅसवर एक पॅन ठेवून त्यात तेल टाकून तयार मिश्रणाचा एक पोळा टाका. बाजूने थोडं तेल सोडा. मध्यम आचेवर एकाबाजूने ३-४ मिनिटांसाठी चांगला शिजू द्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील ३ मिनिटं शिजू द्या.

पोळा एका शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवा. यात थोडं तेल घाला.

तेल तापलं की त्यात पालक आणि मशरुम टाकून चांगलं परतू द्या. या भाज्यांवर चिमूठभर मीठ टाका. १-२ मिनिटांसाठी झाकणं ठेवून वाफ घ्या. भाज्यांना पाणी सुटणार नाही याची काळजी घ्या.

यानंतर जवळपास पूर्णपणे शिजलेल्या चणा ऑमलेटवर वरून या परतलेल्या भाज्या, तुम्हाला हवं असल्यासं थोडं किसलेलं चीज टाकून ऑमलेट फोल्ड करा आणि गॅस बंद करा.

अशा प्रकारे तुमचं तयार झालेलं चणा पालक मशरुम ऑमलेट नाश्तासाठी एक टेस्टी आणि हेल्दी पर्याय आहे.

हे देखिल वाचा-

छोल्यांची रेसिपी
Easy Chana Masala Recipe : धाबा स्टाईल छोले मसाल्याची सर्वात सोपी रेसिपी, एकदा पाहून घ्या!

काबुली चणा व्हेजी कबाब

खास करून संध्याकाळच्या वेळी काही तरी चमचमीत खाण्याची अनेकांची इच्छा होते. यासाठी काबुली चणा व्हेजी कबाब हा एक मस्त पर्याय आहे. हेल्दी आणि टेस्टी कबाबमुळे तुमचं वजनही वाढणार नाही आणि रुचकर खाण्याची इच्छाही पूर्ण होईल.

साहित्य- १ वाटी काबुली चणे, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, १-२ लसणाच्या पाकळ्या, धणे-जिरे पूड, हिंग, हळद, मीठ, आमचूर पावडर, कोथिंबीर, किसलेलं गारज, किसलेलं बीट, १ उकडलेला बटाटा, तांदळाचं किंवा बेसण २ चमचे

कृती- हे कबाब बनण्यासाठी आधी छोले ४-५ तास पाण्यात भिजवून घेणं गरजेचं आहे.

त्यानंतर छोले कुकरला ४-५ शिट्या घेऊन शिजवून घ्यावे. शिजताना अर्धा चमचा मीठ घालावं.

यानंतर एका मोठ्या वाडग्यात उकडलेले छोले घ्यावे. हे छोले हाताने किंवा ब्लेन्डरच्या मदतीने बारीक करावे. छोल्यांची बारीक पेस्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. ते भरड करावे.

यात चिरलेला कांदा. ठेचलेला लसूण, मिरची, हळद, हिंग, मीठ, आमचूर पावडर, कोथिंबीर, किसलेलं गाजर, किसलेलं बीट, १ उकडलेला बटाटा हे सर्व साहित्य घालून मिश्रण एकजीव करावं. यात १-२ चमचा तांदळाचं पीठ घालावं.

आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते हाताने हलके दाबावे.

त्यानंतर गॅसवर एक डिप पॅन ठेवून त्यात २ चमचे तेल घालावे.

तेल तापल्यावर हे कबाब दोन्ही बाजूने लालसर परतून घ्यावे.

अशा प्रकारे तुमचे कुरकुरीत आणि टेस्टी असेल चणा वेजी कबाब तयार होतील. हे कबाब तुम्ही पुदीना चटणीसोबत खावू शकता.

सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये अशा प्रकारे तुम्ही छोल्याच्या या टेस्टी डिश बनवून वजन वाढण्याची चिंता न बाळगता जिभेचे चोचले पूर्ण करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com