
फळे, दही, दूध, सॅलड, डाळ, मटण यातून पोषक तत्वे मिळतात पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्यासोबत योग्य गोष्टी खाता. एकावेळी अनेक पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं.
मुंबई - काही लोक त्यांच्या आहारावर जास्त लक्ष देतात. ठरलेल्या डाएटनुसार त्यांचं खाणं पिणं सुरु असतं. मात्र तरीही अनेकदा कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती त्यांना नसते. फळे, दही, दूध, सॅलड, डाळ, मटण यातून पोषक तत्वे मिळतात पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्यासोबत योग्य गोष्टी खाता. एकावेळी अनेक पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आयुर्वेदात कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती मिळते. थंड आणि गरम, गोड आणि खारट असं मिश्रण खाणं टाळावं.
जेवणाच्या वेळी अनेकांना दही खाण्याची सवय असते. दह्यासोबत आंबट फळं खाऊ नयेत. दही आणि फळामध्ये वेगवेगळ्या एंजाइम असतात .यामुळे पचनास जड जातं. यासाठी दोन्ही एकत्र खाण्याचा सल्ला दिला जात नाही. दही गरम किंवा उष्णता असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये. माशामध्ये उष्णता असते यासाठी मासे दह्यासोबत खाऊ नयेत. पराठे, पूरी यासारख्या तळलेल्या गोष्टींसोबतही दही खाणं चांगलं नसतं. याशिवाय दही आणि खजूर किंवा चिकनसुद्धा एकत्र खाऊ नये.
हे वाचा - हेल्दी रेसिपी’मध्ये देखील कोहळ्याचे बोंडे बनणार
दुधासोबत काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध आणि खारट पदार्थ एकत्र खाणं टाळावं. तसंच दुधाच्या चहासोबतही असे पदार्थ खाऊ नयेत. मिठ मिसळल्याने मिल्क प्रोटीन घट्ट होतं आणि त्यात पोषण कमी होतं. दुधासोबत फळेही खाऊ नयेत. दुधात फळे मिसळून खाल्ल्याने त्यातील कॅल्शिअम फळांच्या एंजाइमला शोषून घेते. यातून शरीराला फळांमधून मिळणारी पोषक द्रव्ये मिळत नाहीत.
शिवाय उडीद दाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. हिरव्या भाज्या किंवा मूळा खाल्यानंतरही दुध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अंडी, मटण आणि पनीर यासारख्या पदार्थांच्या सेवनानंतर दूध पिऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते.
हे वाचा - गाढवाच्या दुधापासून बनतं जगातलं सर्वात महागडं पनीर, किंमत वाचून चकीत व्हाल
काही फळेसुद्धा एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो. यामध्ये संत्री आणि केळे एकत्र खाऊ नये. कारण आंबट फळे गोड फळांमधून निघणाऱ्या साखरेमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे पचनाला त्रास होऊ शकतो.
मध कधीच गरम करून खाऊ नये. ताप वाढत असेल तर मधाचे सेवन टाळावे. खाल्ल्याश शरिरात पित्ताचे प्रमाण वाढते. मध आणि लोणी किंवा तूप एकत्र खाऊ नये. इतकंच काय मधात पाणी घालून पिणेही हानीकारक ठरण्याची शकता असते.
हे वाचा - पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत!
आयुर्वेदात जरी थंड गरम पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत सांगण्यात आलं असलं तरी मॉडर्न सायन्स बॅलन्स असलेलं डाएट या गोष्टी मान्य करेलच असं नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा पदार्थांचे सेवन करावे. आपल्या आहारात पचनशक्ती बिघडेल अशा गोष्टींचा समावेश असणार नाही याची काळजी घ्यावी.