esakal | पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत!
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

भाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून केवळ टेस्ट म्हणून त्या खाल्ल्या जात नाहीत. तर आरोग्यासाठीही त्याचे लाभ पाहिले जातात. भाज्या खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिनसह रोग प्रतिकार शक्तीही वाढते.

पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत!

sakal_logo
By
ई सकाळ

जेवणात भाजी कशाची आहे हा प्रश्न न पडणारी व्यक्ती दुर्मीळच असावी. भाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून केवळ टेस्ट म्हणून त्या खाल्ल्या जात नाहीत. तर आरोग्यासाठीही त्याचे लाभ पाहिले जातात. भाज्या खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिनसह रोग प्रतिकार शक्तीही वाढते. जगात अनेक प्रकारच्या भाज्या आहेत. वेगळ्या भागात वेगवेगळ्या हंगामात या अनेक प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात. जगभरात खाल्ल्या जाणाऱ्या आणि वापरल्या जाणाऱ्या काही भाज्या आणि मसाल्यातील पदार्थ यांची माहिती घेणार आहे. काही भाज्या अशा आहेत ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. मानवी शरीर यामुळे निरोगी राहतं तसंच रोग प्रतिकार शक्तीही वाढते. या भाज्या दररोजच्या जेवणात असतील तर अनेक गंभीर आजारांपासून आपण वाचू शकतो. 

लसूण -
लसूण खरंतर प्रत्येक भाजी, आमटी यामध्ये मसाला म्हणून वापरला जातो. याशिवाय थंडीच्या दिवसातही खाल्ला जातो. लसणामध्ये सर्वात खास असं एलिसिन आढळतं. यामुळेच अनेक देशांमध्ये लसून खाल्ला जातो. लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तामधील अपायकारक अशा ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाणही कमी होतं. तसंच कॅन्सरपासून वाचण्यासाठीही याची मदत होते. 

हे वाचा - एक कप चहात फक्त दोन गोष्टी अॅड करून पहा, आरोग्यासाठी आहे फायद्याचे

पालक -
पालकची भाजी ही जगातील सर्वात हेल्दी भाज्यांपैकी एक आहे. पालकच्या हिरव्या रंगाच्या पानामध्ये बीटा कॅरोटीन आणि ल्युटिनसारखे अँटिऑक्सिडेंट्स असतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय पालकमधून व्हिटॅमिन ए मिळते. पालकची भाजी खाणाऱ्यांची नजर चांगली राहते. फक्त 30 ग्रॅम पालक खाल्ल्यास तुम्हाला दररोज व्हिटॅमिन ए चं शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणातील 56 टक्के भाग मिळतो. याशिवाय व्हिटॅमिन के सुद्धा असतं. त्यात कॅलरीज कमी असतात. पालक खाल्ल्याने हृदय विकाराचा आणि रक्तदाबाचा त्रास कमी होतो. 

फ्लॉवर -
फ्लॉवरची भाजीही आरोग्यासाठी चांगली आहे. यामध्ये 2 खास कंपाउंड असतात. ग्लूकोसायनोलेट आणि सल्फोराफेन फ्लॉवरमधून मिळते. दोन्ही कंपाउंड कॅन्सर रोखण्यासाठी मदत करतात. याचा समावेश जेवणात असेल तर क्रॉनिक आजारांचा धोका कमी होतो. फ्लॉवरमध्ये अनेक पोषक तत्वांशिवाय फायबरची कमतरता असते. यातून व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी मिळते. तसंच फॉलेट, पोटॅशिअम, मॅग्निज इत्यादी मिनरल्सही मिळतात. यामुळे हृदयाचे विकार दूर राहतात. 

हे वाचा - जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायद्याचं, अनेक समस्या होतात दूर

हिरवे वाटाणे - 
वाटाणे ही ठराविक काळात मिळणारी भाजी आहे. यातील पोषक तत्वे आणि फायद्यांबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. हिरव्या वाटाण्यांमध्ये जास्त स्टार्च असते. यामध्ये कॅलरीजही जास्त असतात. एक कप वाटाण्यांमध्ये जवळपास 9 ग्रॅम फायबर आणि 9 ग्रॅम प्रोटीन मिळतं. त्याशिवाय वाटाण्यांमध्ये व्हिटॅमिन ए, के आणि सी मिळते. नियासिन, फॉलेट, थायमिन, रायबोफ्लेविन यासारखी पोषक तत्वेही असतात. वाटाणे खाल्ल्याने कॅन्सर सेल्सची वाढही कमी होते.

हे वाचा - 'व्हिटॅमीन डी'च्या कमतरतेमुळे कोरोनाने घेतले सर्वाधिक मृत्यू, वाचा काय आहे उपाय

रताळे -
कंदमूळांपैकी एक असलेल्या रताळेही आरोग्यासाठी लाभकारक असतात. पांढऱ्या रंगापेक्षा गुलाबी रंगाची रताळे खाण्यासाठी आणि शरिराला हेल्दी असतात. जगभरात रताळे स्वीट पोटॅटो म्हणून ओळखली जातात. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बिटा कॅरोटीन असतं. बिटा कॅरोटीन ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवण्यात महत्वाचं ठरतं. रताळे खाल्ल्याने फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन बी6, मॅग्निज, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी इत्यादी मिळते.