Healthy Food : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतील हे लाडू, रेसिपी सेव्ह करून ठेवा उपयोगी पडेल!

गाजर हलव्याशिवायही गाजराचा हा प्रकार अप्रतिम चवदार बनतो
Healthy Food : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतील हे लाडू, रेसिपी सेव्ह करून ठेवा उपयोगी पडेल!

Healthy Food : हिवाळा हा केवळ थंडीचा ऋतूच नाही तर अनेक महत्त्वाच्या सुपरफूड्सचाही आहे. हिवाळ्यात अनेक प्रजातीची फळे आणि पोषक भाज्यांचा हंगाम असतो, त्यापैकी एक म्हणजे "गाजर". महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध गाजर, थंड हंगामात काढले जातात आणि हिवाळ्यातील सुपरफूड म्हणूनही ओळखले जातात. 

केवळ चवीला गोड आहे इतकीच त्याची ओळख नाही. तर, गाजर पौष्टिकतेने समृद्ध आहे आणि हिवाळ्यात त्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. हे एक अतिशय लोकप्रिय सुपरफूड आहे. हिवाळ्यात प्रत्येकाकडेच गाजराचा हलवा स्वीट म्हणून खाल्ला जातो.  

Healthy Food : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतील हे लाडू, रेसिपी सेव्ह करून ठेवा उपयोगी पडेल!
Carrot Juice Benefits : निरोगी त्वचा ते रक्तातील साखरेपर्यंत, गाजराचा रस प्यायल्याने हे जबरदस्त फायदे मिळतील

मग या हिवाळ्यात काहीतरी नवीन करून पहा. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गाजर आणि नारळाच्या लाडूची खास रेसिपी. तुमच्या तोंडाला चव आणण्यासोबतच तुमच्या शरीरासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया ते कसे तयार करायचे आणि त्यांचे काही महत्वाचे फायदे देखील जाणून घेऊया.

गाजर नारळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य

  • चार मध्यम आकाराची गाजर

  • दोन वाट्या किसलेले खोबरे

  • एक चमचा वेलची पूड

  • तीन ते चार चमचे तूप

  • एक वाटी ताजा खवा

  • ४ ते ५ बारीक चिरलेले बदाम

  • २ चमचे तीळ

  • गूळ आवश्यकतेनुसार

Healthy Food : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतील हे लाडू, रेसिपी सेव्ह करून ठेवा उपयोगी पडेल!
Carrot Paratha Recipe : बटाटा अन् मेथीच्या पराठ्याला कंटाळलाय, हा गाजराचा पराठा ट्राय करा

गाजराचे लाडू कसे बनवायचे?

सर्व प्रथम, गाजर स्वच्छ धुवा, सोलून घ्या आणि बारीक किसून घ्या.

आता कढईत तूप घालून त्यात बदाम आणि तीळ सोनेरी होईपर्यंत तळा. नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

आता त्याच कढईत किसलेले गाजर घालून 5 मिनिटे तुपात परतून घ्या. गाजर थोडे मऊ झाले की ते आपोआप पाणी सोडू लागते. त्याचे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत प्रतीक्षा करा.

आता त्यात किसलेले खोबरे घालून दोन ते तीन मिनिटे आणखी परतून घ्या. नंतर हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा. आता कढईत तूप घालून खवा आणि गूळ घालून चांगले शिजवून घ्या.

तुम्हाला स्वारस्य असलेले विषय निवडा आणि तुमचे फीड सानुकूलित करा

शेवटी खवा आणि गुळाच्या मिश्रणात तयार केलेले गाजर आणि नारळाचे मिश्रण घाला. तसेच वेलची पूड, भाजलेले बदाम आणि तीळ घालून मिक्स करा.

गॅस बंद करा आणि त्यांना थोडे थंड होऊ द्या. आता तळहातावर तूप लावून या मिश्रणापासून छोटे लाडू तयार करा.

Healthy Food : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतील हे लाडू, रेसिपी सेव्ह करून ठेवा उपयोगी पडेल!
Carrot Juice : वजन नियंत्रित ठेवायचंय? दररोज एक ग्लास प्या गाजराचा ज्युस

लाडू खाण्याचे फायदे

  • मुलांना सतत गोड हवं असतं तेव्हा गुळापासून बनलेले हे लाडू त्यांना निरोगी ठेवतील.

  • हिवाळ्यात शरीराच्या तापमानाचा पाराही घसरतो. तेव्हा हे लाडू खाणे फायद्याचे ठरेल. ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहील.

  • हिवाळ्यातील थंड वाऱ्यामुळे सर्दी-पडशाची साथ पसरते. तेव्हा हे लाडू तुम्हाला साथीच्या आजारांपासूनही वाचवतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com