Healthy Food : भरपूर पोषण देणारा पालक पराठा; पहा रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Food

Healthy Food : भरपूर पोषण देणारा पालक पराठा; पहा रेसिपी

आजी आजोबा म्हणतात की, आताचे असले जंकफूड वैगेरे काय खाता. त्याने कुठे शरिरात ताकद येते. आमच्या काळात आम्ही असेल ते खाऊन आजही आमची हाडे मजबूत आहेत. विचार केला तर तथ्य आहे त्यात. आजकाल केवळ पोट भरावे म्हणून पोटात काहीही ढकलले जाते.त्यामुळे आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळेच हेल्दी नाश्ता करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.

हेही वाचा: Healthy Food : निरोगी मानसिक आरोग्यासाठी करा या पदार्थांचा सेवन

घरातही नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ ट्राय केले जातात. त्यात सजावट आणि मेयोनिज सारखे पदार्थ अधिक असतात. त्यामुळेच नाश्त्याला पौष्टीक पदार्थच करावेत. पालक कोणत्याही सीजनमध्ये सहज मिळतो. त्यामुळे पालक पराठ्याचा ऑप्शन आहे. पराठे पौष्टीकही आहेत आणि झटपट तयारही होतात.

हेही वाचा: Healthy Lifestyle: रात्री उशिरा जेवल्याने खरंच वजन वाढतं?

पाहुयात कसे बनवायचे पराठे

साहित्य - मैदा २ कप, चिरलेला पालक २ कप, आले चिरून १/२ टीस्पून, लसूण, लवंग, कोथंबिर, हिरवी मिरची २, तेल 3-4 टीस्पून आणि चवीनुसार मीठ.

हेही वाचा: Healthy Diet : जेवण्याची पद्धत, खाण्याची कला!

कृती

पालक सोबत हिरवी मिरची आणि आले घालून बारीक प्युरी तयार करा. आता गव्हाच्या पीठात तयार केलेली प्युरी मीठ आणि तूप मिक्स करून कणिक भिजवा. आता पीठ 20 मिनिटे झाकून ठेवा. आता थोडं तूप घालून पीठ मॅश करून पीठ बनवा. आता पीठ कोरडे पिठ लावून चपातीसारखे पातळ लाटा. तवा गरम करून त्यावर थोडं तूप पसरवून तव्यावर थापा घालून मध्यम आचेवर भाजून घ्या