
Shengdana Koshimbir Recipe For Kids: मित्रांनो, खारे शेंगदाणे बहुतेक लोकांना आवडतात. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ असतात. त्यामुळे लहान मुलांनी मधल्या वेळी 'जंक फूड' खाण्यापेक्षा थोडेसे शेंगदाणे आणि गुळाचा खडा खाल्लेला चांगला, असं पूर्वीच्या काळी आवर्जून सांगत असत. आज आपण कच्च्या शेंगदाण्यांपासून एक चविष्ट पदार्थ करायला शिकूया, चटपटीत अशी ही शेंगदाण्यांची भाज्यायुक्त कोशिंबीर तुम्हाला निश्चित आवडेल.