History Of Panipuri
History Of Panipuri esakal

History Of Panipuri : म्हणून उत्तर प्रदेशचे भैय्या लोक पाणीपुरीचा प्रसार करतायत!

तुम्हाला माहितीय का पहिली पाणिपुरी कोणी बनवली!

History Of Panipuri : ज्या पदार्थाचं नावं ऐकलं की तोंडाला पाणी सुटतं असा पदार्थ म्हणजे पाणीपुरी होय. देशातल्या कोणत्याही राज्यात गेलात तर तिथे तुम्हाला पाणीपुरी विकणारा उत्तर प्रदेशचा भैय्याच दिसतो.  असं का बरं, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नाही ना, तर याबद्दल आम्ही शोधलं आहे ते पहा.

 सर्वांनाच पाणीपुरी आवडते असे कोणी नाही की ज्याला पाणीपुरी आवडत नसेल, पाणीपुरी सगळ्यांच्या आवडीची असते, ती असायलाच हवी.

पाणीपुरी प्रेमींच्या मनात, प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असेल की, पहिल्यांदा ही पाणीपुरी कोणी बनवली असेल, कोण आहे ज्यांनी हा आपल्यासाठी इतका चविष्ट पदार्थ बनवला असेल, काही लोक मगध साम्राज्य म्हणतात तर काही द्रौपदीला श्रेय देतात.

History Of Panipuri
South Indian Food: इडली डोसा सांबार! साऊथ इंडियन पदार्थांच्या पौष्टिकतेचं सिक्रेट काय ?

बिहारी लोकांनीच पाणीपुरीचा प्रसार का करत आहेत. याचं उत्तर आहे त्यांच्याच राज्यात पाणीपुरीचा जन्म झालाय. त्याचं झालं असं की,, प्राचीन भारतातील १६ महाजनपदांपैकी एक मगध साम्राज्य होते, ज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.

काही इतिहासकारांचे मत आहे की पाणीपुरी प्रथम मगध काळात बनवली गेली. ही त्या काळातली गोष्ट आहे ज्या काळात कागदी पोह्यांचा चिवडा, तिळ, लिट्टी चोखा इत्यादी बनवले जात होते. पाणीपुरी बनवणाऱ्या हुशार स्वयंपाकाचे नाव इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवले आहे.

 त्या काळातील मगध आताचे बिहार आहे म्हणजे पाणी पुरीचा जन्म हा बिहारमध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येते. यावर आधारित एक दंतकथा सुध्दा प्रचलित आहे. ती थेट रामायण काळात आपल्याला घेऊन जाते.

History Of Panipuri
Thums Up Panipuri : 'थम्स अप पाणीपुरी' चा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सकडून मात्र...

जेव्हा महाभारताच्या वेळी द्रौपती चे पाच पांडवांसोबत लग्न झाले होते. तेव्हा द्रौपती जेव्हा पाचही पांडवांसोबत आपल्या सासरी आली तेव्हा तिला कुंतीने असा खाद्य पदार्थ बनवायला लावला होतो ज्यामुळे पाचही पांडवांचे पोट भरेल.

द्रौपदीने आपल्या ज्ञानाचा आणि कलागुणांचा वापर करून पाणी पुरीला बनविले. आणि पाचही पांडवांना खायला दिले आणि पाणी पुरी खाल्याने पाचही पांडवांचे पोट भरले, आणि कुंतीने तिला त्यासाठी वरदान दिले होते. असे दंतकथेत सांगितले जाते.

या नावाने ओळखली जाते पाणी पुरी

  • महाराष्ट्र -पाणी पुरी

  • हरियाणा - पाणी पताशी

  • मध्य प्रदेश - फुल्की

  • उत्तर प्रदेश - पाणी के बताशे/पड़ाके

  • असम - फुस्का/पुस्का

  • गुजरात - पकोडी

  • ओडिशा - गुप-चुप.

  • आंध्र प्रदेश, दक्षिण झारखंड, छत्तीसगड, बंगाल, बिहार आणि नेपाळमधील पुचका.

  • दिल्ली, पंजाब आणि पाकिस्तानमध्ये गोल गप्पा.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये पाणी-पुरी या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 2005 मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पाणीपुरी हा शब्द जोडण्यात आला.

History Of Panipuri
Fire Panipuri : फायर है मैं! फायर पाणीपुरीने सोशल मिडियावर लावली आग; पहा व्हिडीओ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com