esakal | लाल मिर्च्यांचं लोणचं तयार करायच्या खास टिप्स

बोलून बातमी शोधा

homemade Red Chili Pickle tips food marathi news}

भारतात या मिर्चीचं वेगवेगळ्या पद्धतीने लोणचंही केलं जातं. आज आपण या मिर्चीचं उत्तम लोणचं कसं बनवायचं ते पाहूया.

लाल मिर्च्यांचं लोणचं तयार करायच्या खास टिप्स
sakal_logo
By
प्रमोद सरवले

औरंगाबाद : सप्टेंबर महिन्यात लाल मिर्च्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात निघत असतं. यांचा उपयोग अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भारतात या मिर्चीचं वेगवेगळ्या पद्धतीने लोणचंही केलं जातं. आज आपण या मिर्चीचं उत्तम लोणचं कसं बनवायचं ते पाहूया.

साहित्य

१ किलो लाल मिर्ची, 400 ग्रॅम आमचूर, 150 ग्रॅम मोहरी, 10 ग्रॅम मेथी, 10 ग्रॅम अजवाइन, 10 ग्रॅम निगेला बियाणे, 50 ग्रॅम कोथिंबीर,10 ग्रॅम बडीशेप बियाणे, 10 ग्रॅम जिरे, 2 ते 3 चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ आणि 500 ग्रॅम मोहरीचे तेल.

कृती
मिर्च्या चांगल्या वाळवून घ्याव्यात. वाळल्यानंतर मिर्च्यातील बिया काढा तसेच देठही काढला पाहिजे. आंबा आणि हिंग वगळता सर्व मसाले एकत्र करून फ्राय करा. मोहरी बारीक करून घ्या. बाकीचे सर्व मसालेही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आमचूर काढून त्यात मोहरी आणि सर्व मसाले एकत्र करा. मीठ आणि हिंगही टाकून व्यवस्थित मिश्रण करून घ्या. त्यानंतर मिर्च्याच्या बियांना मसाल्यात टाका. 

हेही वाचा- कुंडीमध्ये लिंबूचे झाड लावताना या गोष्टी आहेत महत्वाच्या

१०० ग्रॅम तेल गरम करून त्यात टाका. त्यानंतर तो मसाला त्या मिर्च्यात भरून घ्या. दुसऱ्या दिवशी तेल गरम करून सगळ्या मिर्च्या त्यात टाकून घ्या. त्यानंतर त्याला चार ते पाच दिवस उन्हात वाळवा. झाले तयार  लाल मिर्च्यांचं लोणचं. मसाल्यांमध्ये मोहरीचा स्वाद असणे आवश्यक आहे. काही दिवसांनी ते खायला सुरु केलं तर चालेल.

संपादन- अर्चना बनगे