कुंडीमध्ये लिंबूचे झाड लावताना या गोष्टी आहेत महत्वाच्या

अर्चना बनगे
Sunday, 7 March 2021

तुम्ही सहजपणे आता कुंडीमध्ये लिंबू चे झाड लावू शकता वाचा कसे ते

 

 कोल्हापूर : उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडपेय आठवू लागतात. अलीकडच्या काळात अनेक थंड पेय बाजारात आली आहेत. मात्र लिंबू पाण्याचे महत्व आजही कायम आहे. लिंबू पाणी हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक बनले आहे. लिंबू हे प्रत्येक घरात गरजेची  बनले आहे अशावेळी रसदार लिंबू आपण आपल्याच घरा मध्ये किंवा घराजवळ सहजपणे उपलब्ध करू शकतो. बाजारात मिळणाऱ्या लिंबू पेक्षा स्वतः उत्पादित केलेले लिंबू कधीही चांगले. आपल्याकडे कुंडी असेल तर आपण सहजपणे त्यामध्ये लिंबू चे झाड लावू शकतो.

आवश्यक साहित्य
 कुंडी
 माती
 पाणी
 बिया
खत

योग्य बियाची निवड करा..
 कोणतेही झाड अथवा त्या झाडापासून मिळणारे फळ हे बी कोणत्या प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. यासाठी बी चांगले असणे आवश्यक आहे. कुंडीमध्ये झाड येण्यासाठी चांगल्याच प्रकारचे बी आवश्यक असते. यासाठी तुम्ही दर्जेदार दुकानांमध्ये जाऊन बी खरेदी करू शकता. अनेक लोक  बिया ऐवजी लिंबूचे रोप लावतात. बाजारात मिळणारे छोटे-छोटे रोप ही  कुंडीमध्ये आपण लावू शकतो.

अशी करा कुंडी  तयार..
लिंबूचे रोप खरेदी केल्यानंतर आता तुम्हाला कुंडी तयार करणे आवश्यक आहे. कुंडीमध्ये माती घालून ती चांगल्या पद्धतीने खुरप्या ने उकरून  घ्या. यामुळे माती भुसभुशीत होईल. याचा उपयोग लिंबू च्या झाडाची मुळे घट्ट होण्यासाठी होईल. त्याचबरोबर झाडही चांगल्या पद्धतीने लागू होईल. त्यानंतर ही कुंडी काहीवेळ उन्हामध्ये ठेवा. यामुळे मातीतील ओलावा कमी होईल. मातीमध्ये बी घालताना ते दोन ते तीन इंच एवढ्याच खोलीवर  घाला यामुळे  रोप चांगल्या पद्धतीने उगवून येईल.

रसायनयुक्त खताचा वापर करू नका.
 कुंडीमध्ये माती घालत असताना त्यामध्ये खत घालण्याचे विसरू नका. जेव्हा मातीमध्ये खत असते तेव्हाच त्यामध्ये चांगल्या पद्धतीने झाड उगवून येते. तसेच झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते. परंतु   शक्यतो  नैसर्गिक खताचा वापर करा. शेणखत, जैविक खत अथवा कंपोस्ट खत या मातीमध्ये आपण घालू शकतो. रसायनयुक्त खतामुळे रोप खराब होण्याची शक्‍यता असते.

पाणी आणि हवामानावर लक्ष ठेवा
 कोणतेही बी पेरल्यानंतर त्याला नियमित पाणी मिळणे आवश्यक असते. जेव्हा कुंडीमध्ये आपण बी घालतो त्यावेळी त्यास एक ते दोन मग पाणी घालावे. वेळोवेळी एक-दोन मग पाणी यामध्ये जरूर घाला. या दरम्यान हवामान कशी आहे याकडेही लक्ष ठेवा. जेव्हा तुम्ही बी  घालता तेव्हा आलेले रोप कडक उन्हामध्ये  ठेवू नका. यामुळे रोप  करपून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यादा ऊन ज्या ठिकाणी असणार नाही अशा ठिकाणीच ही कुंडी ठेवा.

वेळेवर तण काढा
कुंडीमध्ये झाड लावल्या नंतर त्यात वेळोवेळी उगवणारे आणि वनस्पती काढून टाकने आवश्यक असते. अनेक वेळा काही वनस्पती या झाडालाच बाधक ठरतात. त्यामुळे असे अनावश्यक होऊन आलेले वनस्पती काढून टाकावे. चार-पाच महिन्यानंतर लिंबू लागण्यास सुरुवात होतात. तुम्ही लिंबू पिकू पर्यंत ठेवू शकता अथवा कच्चे वापरासाठी घेऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: can put a lemon tree in the pot tips marathi news