घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मच्छी फ्राय

टीम ई सकाळ
Wednesday, 10 February 2021

ही मच्छी फ्राय सरसोच्या चटणीसोबतही खाऊ शकता. क्रिस्पी ब्रेडक्रंब फिश फ्राय एकदम स्टेटी डिश आहे.

अहमदनगर ः भारतातील मत्स्य पुराण फार जुने आहे. आम्ही धार्मिक ग्रंथाविषयी नाही बोलत. मच्छी पुराणाबद्दल बोलतोय. सुटलं ना तोंडाला पाणी. माश्यांच्या वासामुळे काहींच्या तोंडचं पाणी पळू शकतं. परंतु मासे बनवायची ही अशी रेसिपी आहे, न खाणाराही म्हणेल व्वा... मैं भि टेस्ट करता हूँ...

रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी ब्रेडक्रंब बटर फिश घरच्या घरी बनवू शकता. ही मत्स्यप्रेमींसाठी खास डिश आहे. ही डिश सगळ्यात फेमस आहे. ती तुम्ही नाश्त्यासाठी, एखाद्या पार्टीसाठी वापरू शकता. स्टार्टर म्हणूनही तिचा वापर करता येईल.

हेही वाचा - चमन मेथी मलाई...खाल्लीय तुम्ही कधी

ही मच्छी फ्राय सरसोच्या चटणीसोबतही खाऊ शकता. क्रिस्पी ब्रेडक्रंब फिश फ्राय एकदम स्टेटी डिश आहे. टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, बंगाली सरसो चटणी सोबत खाऊ शकता.  काहीजण ही डिश चिप्स, फ्रेंच फ्राइजसोबत पेअर करतात.

मच्छी फ्रायचे वैशिष्ट्ये ः
मच्छी फ्राय तुम्हाला जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात खायला मिळेल. परंतु तिची सगळीकडेच सारखी टेस्ट नसू शकते. परंतु ओरिजनल मच्छी फ्रायचे वैशिष्ट्य काय असेल तर ती आतून नरम असते आणि बाहेरून क्रिस्पी.

बंगाली मच्छी फ्रायचे वैशिष्ट्य वेगळं आहे. ती महाराष्ट्रातही खायला मिळेल. तुम्ही दिल्लीत असा नाही तर मुंबईत. तिची सदा सर्वकाळ टेस्ट तीच असते.

चला तर पाहू कशी बनवायची मच्छी फ्राय ः त्यासाठी तुम्हाला लागेल फ्रेश मच्छी. त्यात काटे नको. थोडक्यात काय तर बिनकाट्याचे मासे.

 

  • फिश फ्राय बनविण्याची प्रक्रिया ः मीठ, लिंबाचा रस, आद्रक-लसून पेस्ट, हिरवी मिरची पेस्टमध्ये मच्छी लपेटून घ्या.
  • साधारणपणे ३० मिनिटांनंतर प्रत्येक पीसला मैदा लावा. अगोदर अंड्यात आणि नंतर ब्रेडक्रंबला. हे क्रमशः व्हायला हवं.
  • माशाचा प्रत्येक पीस गरम तेलात डीप फ्राय करा. त्याला सोनेरी रंग येईपर्यंत तो फ्राय केला पाहिजे.
  • तयार झालेले फिश फ्राय सरसोच्या चटणी आणि कांद्यासोबत तुम्ही ताटात वाढू शकता.
  • वेगळी टेस्ट येण्यासाठी तव्यावर मच्छी ठेवून चाट मसाल्यातही ती परतू शकता. अशा प्रकारे तुम्हाला क्रिस्पी फिश फ्राय खायला मिळेल.
  •  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homemade Restaurant Style Fish Fry