Healthy and Tasty - घरीच बनवा चिक्कू ज्युस, वाचा सोपी रेसिपी

Healthy and Tasty - घरीच बनवा चिक्कू ज्युस, वाचा सोपी रेसिपी
Summary

घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अवघ्या पाच ते सात मिनीटांच हा ज्यूस बनवता येतो.

ज्युस प्यायचा म्हटंल की आपण कोल्ड्रींक्स हाऊस शोधायला सुरवात करतो. सध्या ऊन- पावसाचे वातावरण सुरु असेल तरीही कधीतरी थंड किंवा वेगळं काही खाण्याची इच्छा होते. जे हेल्दी आणि टेस्टी असते. लहानांसह मोठ्यांनाही पंसतीस येऊ शकते. तुम्ही वजन वाढवत असाल तर हा ज्यूस उपयोगी पडू शकतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात. हा ज्यूस विकत न आणता घरच्या घरी कसा बनवावा, याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अवघ्या पाच ते सात मिनीटांच हा ज्यूस बनवता येतो. काही महत्वाचे घटक यामध्ये टाकल्यास ही रेसिपी आणखी हेल्दी आणि टेस्टी बनू शकते.

Healthy and Tasty - घरीच बनवा चिक्कू ज्युस, वाचा सोपी रेसिपी
सकाळच्या नाश्तासाठी झटपट बनवा हरभरा रोल; जाणून घ्या रेसीपी

साहित्य -

  • चिकू - २

  • दुध - २ ग्लास

  • काजू, बदाम, पिस्ता, खजूर - आवश्यकतेनुसार

  • साखर - ४ चमचे

  • केशर - आवश्यकतेनुसार

Healthy and Tasty - घरीच बनवा चिक्कू ज्युस, वाचा सोपी रेसिपी
रेसिपी : लसूण-मिरची खर्डा

कृती -

काजू शेक बनवण्यासाठी सुरुवातील काजू स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्याच्या साली काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात चिकुचे बारीक तुकडे टाका. त्यात काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे करुन टाका. यात दुध आणि आवश्यकतेनुसार साखर घाला. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र बारीक करुन घ्या. हे लिक्वीड स्वरुपातील मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घ्या. वरुन सर्व्हींगसाठी केशर टाका. थंडगार ज्युस तयार आहे. तु्म्ही तुमच्या वेळेनुसार दिवसात कधीही हे पिऊ शकता.

(टीप - जर तुम्हाला डायबेटिजचा त्रास असेल तर तुम्ही साखर न घालताही हा ज्युस बनवु शकता.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com