Homemade Chivda Recipe: घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

मुलांना स्नॅक्ससाठी डब्यात द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरताे.
Chivda
Chivda sakal

चिवडा म्हणजे लहान मुलांचाच काय पण अगदी मोठ्या माणसांचाही विक पाॅईंट. दुपारी ४ वाजता टी टाईम झाला की काहीतरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा वेळी चिवडा नेहमी हाताशी असायलाच हवा.. पाहूणे आले आता ऐनवेळी झटपट काय करायचे, अशा विचारात असताना घरात अगदी तयार असणाऱ्या चिवड्याचा मोठाच आधार होतो.

मुलांना स्नॅक्ससाठी डब्यात द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरताे. अशातच आपण आज घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा हे जाणून घेणार आहोत.

Chivda
Independence Day 2023: चविष्ट आणि पौष्टिक तिरंगा सँडविच कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

साहित्य :

  • एक किलो स्वच्छ गहू 

  • चवीनुसार मीठ 

  • पापडखार मीठाच्या प्रमाणात

  • एक वाटी शेंगदाणे 

  • कढीपत्ता

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • लसुण

  • जीरं

  • मोहरी

  • हळद 

  • तिखट

गव्हाचा चिवडा करण्याची कृती

प्रथम एक किलो स्वच्छ निवडलेला गहू रात्रभर भिजवावा. दुस-या दिवशी सकाळी, तो गहु कुकरमधे पाण्यात 4 ते 5 शिट्यांवर शिजवावा. यात काळजी एकच घ्यायची की, गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त गव्हाचे दाणे उलेपर्यंत शिजवायचा आहे.

कुकरमधील गहू 3 ते 4 वेळा थंड पाण्यातून काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरलेले पाणी काढून त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळून ठेवावे. नंतर हे गहू कपडयावर पसरवून कडक उन्हात वाळवावे.

Chivda
Bajri Halawa Recipe: बाजरीची भाकरीच नाही तर हलवाही आहे स्वादिष्ट अन् पौष्टिक, जाणून घ्या रेसिपी

वाळवलेले गहू कोरड्या आणि स्वच्छ डब्यात भरून ठेवावेत. हे असे वर्षभर राहू शकतात. नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढून  कोरड्या कढईत भाजून घ्यावेत. असे भाजत असताना त्यात तेल टाकू नये. आता चिवडा बनवताना आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळून घ्यावेत.

लसूण बारीक चिरून तोही तळून घ्यावा. हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरून तळून घ्यावी. यानंतर एका कढईत फोडणीसाठी तेल ठेवून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, तिखट टाकून त्यात हे भाजलेले गहू परतून घ्यावेत. अशा रितीने आपला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com