Kakadi Pohe Recipe: हेल्दी अन् टेस्टी काकडीचे पोहे, जाणून घ्या सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काकडीचे पोहे

Kakadi Pohe Recipe: हेल्दी अन् टेस्टी काकडीचे पोहे, जाणून घ्या सोपी रेसिपी

दररोज नाश्त्याला काय वेगळं करावं, हा नेहमीचाच प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. हेल्दी आणि टेस्टी काकडीचे पोहे कसे करायचे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य :

 • साधे पोहे

 • दूध,

 • घट्ट सायीचे दही

 • मीठ

 • साखर

 • कोवळी ताजी काकडी

 • तेल

 • हिंग

 • मोहरी

 • कढीपत्ता

 • मिरच्या

 • कोथिंबीर.

 • मीठ

 • लिंबाचा रस

हेही वाचा: Vangi Bhat Recipe: असा करा टेस्टी वांगी भात, एकदा खाल तर बोटे चाखाल

कृती -

 • पोहे धुवून चाळणीवर निथळावेत.

 • काकडी बारीक करुन घ्यावी.

 • पोह्यांमध्ये दूध, दही, साखर, मीठ आणि काकडी घालावी.

 • पोहे जरा थलथलीत भिजवावेत. कारण थोड्या वेळाने ते कोरडे होतात.

 • थोड्या तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करावी

 • त्यात पोहे मिक्स करावे आणि नंतर त्यावर कोथिंबीर आणि लिंबू टाकावे.