Khaja: जगन्नाथ पुरीचा प्रसिद्ध गोड पदार्थ 'खाजा'चा रंजक इतिहास आणि सोपी रेसिपी!

Recipe of Odisha's Khaja: टेस्टअ‍ॅटलसच्या टॉप १० पेस्ट्रीजमध्ये स्थान मिळवणारा ओडिशाचा पारंपारिक गोड पदार्थ;जाणून घ्या बनवण्याची पद्धत...
Khaja Recipe

Khaja Recipe

esakal 

Updated on

Make Puri’s Famous Khaja At Home:ओडिशाच्या खाद्यसंस्कृतीचा विचार केला की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे पुरीचा जगप्रसिद्ध 'खाजा' (Khaja). हा फक्त एक गोड पदार्थ नसून तो ओडिशाच्या समृद्ध वारशाचा अविभाज्य भाग आहे. जागतिक कीर्तीच्या 'टेस्टअ‍ॅटलस'ने (TasteAtlas) भारतातील सर्वोत्तम १० गोड पेस्ट्रीजमध्ये या खाजाला स्थान दिले आहे. सध्या जगन्नाथ रथयात्रा सुरू आहे.जगन्नाथाला दाखवल्या जाणाऱ्या ५६ भोगांमध्ये खाजाला महत्व आहे. तर भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळालेला आणि धार्मिक महत्त्व असलेला हा पदार्थ नेमका कसा तयार झाला आणि त्याचा इतिहास काय आहे, यावर टाकलेला हा विशेष प्रकाश.

मौर्य साम्राज्याशी जोडलेली नाळ

जरी आज खाजा हा ओडिशा आणि विशेषतः पुरीची ओळख असला, तरी याचा इतिहास खूप जुना आहे.

  • मौर्य साम्राज्य आणि बिहार कनेक्शन: सर्वात विश्वसनीय सिद्धांतानुसार, खाजाचा उगम मौर्य साम्राज्यात, गंगा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशात झाला. बिहारमधील नालंदा जवळ असलेल्या 'सिलाव' (Silao) या छोट्या शहरात बनवल्या जाणाऱ्या खाजाला 'जीआय टॅग' मिळालेला आहे.

  • ऋग्वेद आणि अर्थशास्त्रामध्ये उल्लेख: ऋग्वेद आणि चाणक्य यांच्या अर्थशास्त्रामध्येही गव्हापासून बनवलेल्या अशाच एका थरांच्या गोड पदार्थाचा (खाज्जक) उल्लेख आढळतो. १३ व्या शतकातील 'मानसोल्लास' या पाककृती पुस्तकातही याचे संदर्भ मिळतात.

  • गौतम बुद्धांचा आवडता पदार्थ: असे म्हटले जाते की भगवान गौतम बुद्ध यांना देखील खाजा आवडायचा. ते हा पदार्थ दुधात चुरून बौद्ध भिक्खूंना प्रसाद म्हणून देत असत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com