Cooking Tips : फूड प्रोसेसरशिवाय अन् हातही न भरवता चपातीसाठी मळा परफेक्ट कणिक

नव्याने जेवण बनवायला शिकणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठा प्रश्न कणिक मळताना हात भरतात याचं. जाणून घ्या त्यावरचा सोपा घरगुती उपाय.
Cooking Tips
Cooking Tipsesakal

Kitchen Cooking Tips : पोळी, चपाती ही आपल्या रोजच्या जेवणातला एक अविभाज्य भाग आहे. पण त्यासाठी मळाव्या लागणाऱ्या कणकेने हात बरबटतात. याला कंटाळून काही लोक स्वयंपाक शिकणं थांबवतात, तर काही फूडप्रोसेसरचा पर्याय निवडतात. पण हा पर्याय पुरेसा ठरत नाही. पण या समस्येवर आम्ही एक घरगुती सोपा उपाय घेऊन आलो आहोत.

चांगल्या नरम मऊसूत पोळ्या/चपात्या होण्यासाठी जसं योग्य लाटणं, शेकणं आवश्यक असतं. तशीच कणिकही योग्य मळली जाणं आवश्यक आहे. तरच चपात्या मऊ राहतात.

चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. चपातीसाठी पीठ मळताना हात बरबटले जातात ते साफ करता करता नाकी नऊ येतात, त्यात पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर वैताग येतो. अश्यावेळी चला पाहूया कणिक पाळण्याची सोपी पद्धत

कृती

पीठ मळण्यासाठी दिड काप कणिक घ्या, अर्धा चमचा तेल, पाणी आणि चंपीप्रमाणे मीठ इतकं आवश्यक आहे. पीठ मळताना नेहमी एक लक्षात ठेवा कधीही खोलगट भांड्याचा वापर करा.. आता या भांड्यात गव्हाचं पीठ घाला त्यात दोन चमचे तेल घाला. (तेल घातल्याने पीठ मऊसर होते शिवाय याच्या चपात्या चांगल्या मऊसूद राहतात) आता लागेल तंस पाणी घालून घ्या.

हे सर्व मिश्रण तुम्हाला लाटण्याच्या एका टोकाने गोल गोल फिरवायच आहे, एक लक्षात ठेवा एका दिशेने तुम्हाला हे फिरवायचं आहे, लागेल तस पाणी हळू हळू घाला आणि अवघ्या काही मिनिटात पिठाचा मऊसूद आणि लाटायला सोपा गोळा तयार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com