दोडक्याच्या सालीपासून बनवा मस्त अशी खमंग चटणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

अनेकजण दोडका बनवताना त्याच्यावरील साल काढून टाकतात. त्यानंतर त्या दोडक्याची भाजी बनवतात. पण तुम्हाला माहितीय का दोडक्याच्या सालीपासून मस्त अशी खमंग चटणीसुद्धा बनवता येते. जी की ती चटणी खूप चविष्ट आणि खमंग लागते. 

पुणे : दोडका म्हणजे कुणाचाही लाडका नसलेला असं समीकरणच झालाय जणू. फार कमी लोकांना दोडक्याची भाजी आवडते आणि त्याची भाजी करतेवेळी दोडक्याच्या सोलून काढलेल्या (साल) शिरांना नेहमीच फेकून देण्यात येत. पण याच शिरा वापरून आपण खूप चवीष्ट चटणी बनवू शकतो. अहो खरंच. चला तर मग दोडक्याच्या सालीपासून खमंग चटणी कशी बनवायची ती जाणून घेऊयात. तुम्हाला ही चटणी नक्की आवडेल. 

झटपट तयार करा मटर पुलाव अन् मसालेदार भाजीसोबत घ्या गरम पुलावचा आनंद

रोजच्या आहारात आपल्याला जी भाजी आवडेल ती बनवण्यास जास्त प्राधान्य देतो.  त्यात अशा काही भाज्या आहेत ज्याचे नाव जरी ऐकलं आणि बोलो तरी किळस येतो. पण तीच भाजी एका वेगळ्या पद्धतीने बनवली तर ती काहीजणांना लगेच आवडते. आणि ती भाजी हवीहवीशी होऊन जाते.

नूडल्स खाऊन खाऊन बोर झाले? आता घरीच तयार करा नूडल्स पकोडे

त्यातीलच एक दोडक्याची भाजी. आता हे नावच ऐकून अनेकांना किळसवाणे वाटत असेल. काही जणांची आवडती भाजी आहे तर काही जणांची नावडती भाजी. अनेकजण दोडका बनवताना त्याच्यावरील साल काढून टाकतात. त्यानंतर त्या दोडक्याची भाजी बनवतात. पण तुम्हाला माहितीय का दोडक्याच्या सालीपासून मस्त अशी खमंग चटणीसुद्धा बनवता येते. जी की ती चटणी खूप चविष्ट आणि खमंग लागते. 

साहित्य :  

- दोडक्याची साल/शिरा

- लसूण पाकळ्या,

- हिरवी मिरची,

- जिरे,

- मीठ

कृती :

सुरवातीला दोडक्याची साल काढून घ्या. एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून ही साल मंद आचेवरती खरपूस भाजून घ्या. नंतर ती एका प्लेटमध्ये काढून पॅनमध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे एक चमचा तेल टाकून तेही छान भाजून घ्या. आता सर्व साहित्य थंड झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. अशाप्रकारे मस्त अशी खमंग दोडक्याच्या सालीची चटणी तयार झाली आहे. गरमागरम भाकरी सोबत खाण्याची मजाच काही ओर आहे.

( सविता चौगुले )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a delicious chutney from Dodaka Sali

Tags
टॉपिकस
Topic Tags: