esakal | Food Tips : कॉर्नपासून बनवा वेगवेगळ्या पाककृती
sakal

बोलून बातमी शोधा

Food Tips : कॉर्नपासून बनवा वेगवेगळ्या पाककृती

Food Tips : कॉर्नपासून बनवा वेगवेगळ्या पाककृती

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : फास्ट फूड कोणाला खायला आवडत नाही. आज प्रत्येकाच्या आवडीचे झाले आहे फास्ट फूड. कधीकाळी हॉटेल, टपरीवर मिळणारे हे पदार्थ आता प्रत्येकाच्या घरी तयार होऊ लागले आहेत. यावरून त्याची आवड आपल्या लक्षात येईल. याउलट आपण घरी कॉर्नपासून (corn) तयार केलेले विविध प्रकारचे डिश खाऊ शकतो. कॉर्नच्या बऱ्याच पाककृती बनवता येतात. हेच आपण आज जाणून घेणार आहोत... (Make-different-recipes-from-corn)

जगभरातील लोकांना फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वाची भरपूर असलेले कॉर्न खायला आवडते. कॉर्न एक लोकप्रिय खाद्य आहे. जे भाज्या आणि धान्य अशा दोन्ही प्रकारात खाल्ले जाते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर समजले जाते. कॉर्न शरीरातील लोह पातळी वाढवून वजन कमी करण्यास मदत करते. अनेकांना कॉर्न गोड खायला आवडते. ते इतरही प्रकारे खाल्ले जाऊ शकते.

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

डोसा व पराठे भरणे

घरी डोसा किंवा पराठा बनवताना बटाटे आणि पनीरमध्ये कॉर्न टाकू शकता. यामुळे तुमचा डोसा किंवा पराठा आणखी रुचकर होईल. डोसामध्ये कॉर्न उकळून टाकल्याने त्याची चव वाढेल. तसेच पराठ्यामध्ये कॉर्न टाकताना बारीक करून घ्या. अस केल्याने पराठा फाटणार नाही.

कॉर्न पुडिंग बनवा

कॉर्न पुडिंग ही दक्षिण अमेरिकेची एक लोकप्रिय डिश आहे आणि ती बऱ्यापैकी मलाईवाली आहे. कॉर्न पुडिंगला पाणी, उकडलेले कॉर्न आणि इतर अनेक घटकांसह तयार केले जाते. विशेषः म्हणजे ते घरीच सहजपणे तयार करता येते. तुम्ही कॉर्न पुडिंग तयार करताना त्यात अन्य सामग्री टाकून त्याचा स्वाद वाढवू शकता.

भातासोबत खा

घरी भात तयार करताना प्रेशर कुकरमध्ये उकडलेल्या कॉर्न कर्नलबरोबर इतर भाज्याही टाका. असे केल्याने तुमच्या भाताची चव वाढेल. जेव्हाही तुम्‍हाला कमी खाण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही कॉर्न राईस बनवू शकता.

हेही वाचा: नाना पटोले अपघातग्रस्ताच्या मदतीला धावतात तेव्हा...

डिप्स अगदी चवदार बनवा

प्रत्येक पार्टीत फिंगरफूड आणि स्नॅक्ससह डिप्स दिले जाते. डिप्सला अधिक स्वादिष्ट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी कॉर्न टाकू शकता. चवदार आणि कुरकुर डिप्ससाठी उकडलेल्या कॉर्नसोबत अंड्यातील बलक, कांदा, चीज आणि मलाई टाकून कॉर्न डिप तयार करू शकता. याला चिरलेली भाजी, बटाटा चिप्स, नाचोस आदींसोबत खाता येते.

सलाद म्हणून खा

तुम्ही कॉर्नला सलादच्या स्वरुपातही खाऊ शकता. फळ आणि भाज्यांनी भरलेल्या ताटात कॉर्न देखील टाकून खाऊ शकता. कॉर्न सलादमध्ये वेगळी चव आणण्यासोबत आरोग्यदायी फायदे देखील देईल.

(Make-different-recipes-from-corn)

loading image