

आईस अॅपल हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला सफरचंदाचा हा कोणता नवा प्रकार आहे का असा प्रश्न पडू शकतो. मात्र ताडगोळा हा शब्द एकताच तुमच्या डोळ्यासमोर लगेचच थंडगार, रसाळ आणि गुबगुबीत असलेलं फळ दिसू लागेल. ताडगोळ्यालाचा इंग्रजीमध्ये आईस अॅपल म्हणातात. Marathi Health Tips know the benefits of ice apple
खास करून उन्हाळ्यामध्ये हे फळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. ताडगोळ्यामुळे Ice Apple शरीराला थंडावा मिळण्यासोबतच या फळाचे शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे Health Benefits आहेत. ताडगोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आढळतात.
यामध्ये कार्बोहायड्रेट, फायटोन्यूट्रिएंट्स, कॅल्शियम Calcium तसंच फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे यात प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि ई देखील उपलब्ध असतात.
ताडगोळ्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात. तसंच यात आयर्न, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजंदेखील असल्याने हे फळं आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
शरीर हायड्रेट ठेवतं- ताडगोळा फळामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. यासाठीच खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताडगोळ्याचं सेवन फायदेशीर ठरतं. तसंच शरीर नैसर्गिकरित्या थंड राहण्यासाठी देखील मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते- शरीरात थकवा आल्यास किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास शरीराला बळकट बनवण्यासाठी आणि इस्टंट एनर्जीसाठी ताडगोळ्याचं सेवन उपयुक्त ठरतं. ताडगोळा फळामध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसंच या फळाच्या सेवनामुळे एनर्जी बुस्ट होण्यास मदत होते.
हे देखिल वाचा-
पचन आणि पोटाचे विकार होतील दूर- जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील. तसंच बद्धकोष्ठता, मळमळ, पोटात सूज अशा पोटाच्या समस्या असतील तर ताडगोळ्याचं सेवन केल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो. पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून ताडगोळ्याचं सेवन उपयुक्त ठरतं.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- जर तुम्ही वजन कमी करण्याठी प्रयत्न करत असाल, तर तुमच्या डाएटमध्ये आईस अॅपल म्हणजेच ताडगोळ्याचा समावेश करा. ताडगोळ्यामध्ये असलेल्या पाण्याचं जास्त प्रमाण तसंच फायबरमुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला सतत भूक लागत नाही.
तसंच ताडगोळ्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यल्प असून मोठ्या प्रमाणात पोषक तत्व उपलब्ध असतात. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासोबत आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होता.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी- ताडगोळ्यामुळे लिव्हर म्हणजेच यकृत निरोगी राहण्यास मदत होते. या फळामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे यकृताच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच यकृत डिटॉक्स करून यकृताचं आरोग्य चांगलं राखण्यास ताडगोळा उपयुक्त आहे.
मधुमेही रुग्णदेखील करू शकतात सेवन- ताडगोळ्याचं संतुलित प्रमाणात सेवन करणं मधुमेही रुग्णांसाठीदेखील फायद्याचं ठरू शकतं. ताडगोळा फळाचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर- ताडगोळा फळाचे त्वचेलाठी देखील फायदे आहेत. खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर पुरळ येतं. अशावेळी पुरळ आलेल्या ठिकाणी तुम्ही ताडगोळा स्क्रब करू शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तसंच ताडगोळ्याच्या सेवनामुळे शरीरात पाण्यांच प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी त्वचादेखील हायड्रेट राहून सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
अशा प्रकारे ताडगोळ्याचे शरीरासाठी अनेक फायदे असले तरी ताडगोळ्याचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा काही समस्या निर्माण होवू शकतात.
हे देखिल वाचा-
ताडगोळ्याचं सेवन करताना घ्या ही काळजी-
- ताडगोळ्याचं अतिप्रमाणात सेवन केल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होवू शकते.
- पचनाच्या समस्या असलेल्यांनी ताडगोळ्याचं नियंत्रणात सेवन करावं.
- ताडगोळा खाल्यानंतर पाणी पिऊ नये.
- गरोदर महिलांनी ताडगोळ्याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप - ही माहिती सर्वसाधार गृहितकांवर आधारित आहे. कुठल्याही पदार्थांचं औषध म्हणून सेवन करताना वैद्यकीय सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.