Kadhi Recipe: शिंगाड्याची टेस्टी कढी तुम्ही ट्राय केलीय का? Weight Loss पासून ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यासाठी आहे फायदेशीर

Kadhi Recipe in Marathi: शिंगाड्याची कढी बनवणं अत्यंत सोपं आहे. शिवाय या कढीचे आरोग्यासाठी देखील फायदे आहेत. ही कढी पचनासाठी Digestion अत्यंत हलकी आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
शिंगाड्याची कढी
शिंगाड्याची कढीEsakal

Kadhi Recipe: शिंगाडा किंवा शिंगाड्याच्या पीठाचा वापर हा साधारण उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. आपल्याकडे खास करून शिंगाड्याच्या Water Chestnut पीठाच्या उपवासासाठी पुऱ्या तयार केल्या जातात. Marathi Healthy food Tips Water chestnut Curry for weight loss

मात्र शिंगाड्याच्या पीठाची कढी Curry देखील अत्यंत चविष्ट बनते. केवळ उपवासासाठीच नाही तर रोजच्या जेवणात Meal एखादा हटके पर्याय म्हणून तुम्ही शिंगाड्याची कढी बनवू शकता. 

शिंगाड्याची कढी बनवणं अत्यंत सोपं आहे. शिवाय या कढीचे आरोग्यासाठी देखील फायदे आहेत. ही कढी पचनासाठी Digestion अत्यंत हलकी आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसचं कोलेस्ट्रॉल Cholesterol नियंत्रणात राखण्यासाठी देखील शिंगाड्याचं पीठ उपयुक्त आहे. त्यामुळे जेवणामध्ये हा टेस्टी आणि हेल्दी पर्याय नक्की ट्राय करा. तेव्हा पाहुयात या कढीची रेसिपी

शिंगाडा पीठाच्या कढीसाठी लागणारं साहित्य 

शिंगाड्याचं पीठ १ कप, १ उकडलेला बटाटा, २ हिरव्या मिरच्या, जीरं अर्धा टी स्पून, आलं बारीक किसलेललं,  हिंग पाव टी स्पून, कडीपत्ता ७-८ पानं,  काळी मिरी पावडर, अर्धा टी स्पून, कोथिंबीर, दही एक वाटी, साजूक तूप २ चमचे, मीठ चवीनुसार

हे देखिल वाचा-

शिंगाड्याची कढी
पोषक-पूरक : शिंगाडा

शिंगाडा पीठाच्या कढीसाठी लागणारं साहित्य 

शिगंगाड्याचं पीठ १ कप, १ उकडलेला बटाटा, २ हिरव्या मिरच्या, जीरं अर्धा टी स्पून, आलं बारीक किसलेललं,  हिंग पाव टी स्पून, कडीपत्ता ७-८ पानं,  काळी मिरी पावडर, अर्धा टी स्पून, कोथिंबीर, दही एक वाटी, साजूक तूप २ चमचे, मीठ चवीनुसार

शिंगाडा कढी बनवण्याची कृती

शिंगाजा कढी तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता. एक ज्यात तुम्ही बटाटे घालू शकता. तर दुसऱ्या प्रकारात तुम्ही बटाट्याची भजी टाकू शकता. 

  • कढी बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाऊलमध्ये शिंगाड्याचं पीठ आणि दही एकत्र करावं एका रवी, विस्क किंवा चमच्याच्या मदतीने दोन्ही एकजीव करून घ्याव. या मिश्रणात एक वाटी पाणी घालून पुन्हा मिश्रण मिक्स करावं. 

  • आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात फोडणीसाठी २ चमचे तूप किंवा हवं असल्यास तेल घालावं.

  • तूप तापल्यानंतर त्यात जीरं, मिरची आणि कडीपत्ता एक एक करून टाका. जीरं तडतडल्यानंतर त्यात आल्याचे तुकडे घालावे. 

  • त्यानंतर हिंग आणि हळद टाकावी. 

  • यात उकडलेल्या बटाट्याचे काप करून चांगले परतून घ्यावे. 

  • त्यानंतर दही आणि शिंगाड्याच्या पीठाचं मिश्रण ओतावं. हे मिश्रण कढईत टाकल्यानंतर ढवळतं रहावं. 

  • यात चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पूड टाकावी. 

  • कढी ८-१० मिनिटांसाठी उकळू द्यावी, कढी उकळत असताना ती ढवळत राहणं गरजेचं आहे. 

  • यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाकणं ठेवावं आणि गॅस बंद करावा. 

अशा प्रकारे हेल्दी आणि टेस्टी अशी शिंगाडा पीठाची कढी तयार होईल. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भातासोबत तुम्ही या कढीची मजा लुटू शकता. 

शिंगाडा कढीमध्ये तुम्हाला पकोडे टाकायचे असल्यास फोडणीमध्ये बटाटा टाकू नये. त्याएवजी तुम्ही पकोडे अॅड करू शकता. हे पकोडे तयार करणंही सोप आहे.

  • पकोड्यांसाठी २ उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे. यात २ चमचे शिंगाड्याचं पीठ मिक्स करावं. 

  • यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद. धणे-जीरं पूड, आणि थोडी कोथिंबीर टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावं. 

  • त्यानंतर एका कढईत तेल तापत ठेवून मिश्रणाचे लहान लहान गोळे करून ते तळून घ्यावे. 

  • शिंगाड्याची कढी उकळत आली की गॅस बंद करण्याच्या साधारण दोन मिनिटांपूर्वी तुम्ही पकोडे कढीमध्ये टाकू शकता. 

अशा या पकोडे असलेल्या कढीची चव देखील अत्यंत स्वादिष्ट असते. नेहमीची दह्याची कढी किंवा एखाद्या आमटीला किंवा डाळीला पर्याय म्हणून तुम्ही ही शिंगाड्याच्या पीठाच्या कढीचा बेत नक्की आखू शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com