

New Sesame Sweet Recipes to Try This Makar Sankranti: मकर संक्रांत म्हणलं की आठवण येते, ती तिळ आणि गुळाच्या गोड सुवासाची. घरात हलकं हलकं उत्सवाचं वातावरण तयार होतं. सगळ्यांच्या घरात तिळ-गुळाचे लाडू, वडी बनवायला सुरुवात होते. कारण तिळ हे उष्णता देण्यासाठी उत्तम मानले जातात. पण यंदा आपण पारंपारिक लाडूपेक्षा थोडा हटके अनुभव घेऊ शकतो.
तर यावर्षी लोक नवीन आणि ट्रेंडी तिळाच्या मिठाईंचाही आनंद घेत आहेत. यावर्षी फक्त तिळाचे लाडूच नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही खास आणि सोप्या रेसिपीज देखील लोकप्रिय ठरत आहेत. चला तर त्याबद्दल जाणून घेऊया.