Dosa Recipe : नाश्त्यात मूगडाळ-पालकाचा पौष्टिक डोसा खा अन् वजन कमी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recipe

Dosa Recipe : नाश्त्यात मूगडाळ-पालकाचा पौष्टिक डोसा खा अन् वजन कमी करा

दररोज सकाळी नाश्त्यात काय बनवावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आज आपण हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ताची रेसिपी जाणून घेणार आहोत. आज आपण मूगदाळ पालक डोसा करायचा, हे जाणून घेऊया. (moong dal palak dosa recipe)

साहित्य -

 • अर्धा कप पिवळी मूगडाळ

 • सहा-सात पालकची पाने

 • आल्याचा तुकडा

 • तीन-चार हिरव्या मिरच्या

 • चार-पाच लसूण पाकळ्या

 • खायचा सोडा

स्टफिंगसाठी -

 • पाव कप किसलेले गाजर व पनीर

 • एक चिरलेली सिमला मिरची

 • एक छोटा चमचा मिक्स मसाला

 • पाव छोटा चमचा काळीमिरी पावडर

 • तेल

 • मीठ

हेही वाचा: Gold Plated Food Dish : अबब! रेस्टॉरंटमध्ये चक्क 1.3 कोटींच बिल; जेवणाऱ्यांनी लावला डोक्याला हात

कृती -

 • मुगाची डाळ धुऊन दोन-तीन तास भिजत ठेवावी.

 • पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्यावी. डाळीतील पाणी काढून मिक्सरमध्ये डाळ, पालकाची पाने, हिरव्या मिरच्या, आले, लसूण घालून बारीक वाटून घ्यावे. वाटताना थोडेसे पाणी घालावे.

 • एका भांड्यात किसलेले गाजर, किसलेले पनीर, चिरलेली सिमला मिरची, काळी मिरी पावडर, मिक्स मसाले, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

हेही वाचा: Winter Season Food : थंडीचा महिना...गरम अन् पौष्टिक आहार खा!

 • हे सारण तयार आहे. वाटून घेतलेली डाळ एका पातेल्यात काढून घ्यावी. मीठ व खायचा सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

 • गॅसवर डोशाचा तवा तापला, की त्याला तेल लावून घ्या. डोसा तयार करून घ्या.

 • वरची बाजू पूर्ण कोरडी झाल्यानंतर, तेल टाकून वरून तयार सारण पसरून घ्यावे. नंतर डोसा दुमडून घ्यावा.

 • वरीलप्रमाणे सर्व डोसे करून घेणे. खायला देताना सुरीने त्याचे छोटे तुकडे करून घेतल्यास खूप छान दिसतात.

  - शुभांगी देशमुख वाटाणे