Soya Poha Recipe: सकाळी नाश्त्यात घरीच बनवा हेल्दी अन् स्वादिष्ट सोयापोहे, जाणून घ्या रेसिपी

Soya Poha Recipe: जर तुम्हाला नाश्त्यात पोहे खायला आवडत असतील तर इतर कोणत्याही पोह्याऐवजी हेल्दी आणि चविष्ट सोयापोहे सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.
Soya Poha Recipe
Soya Poha RecipeSakal

morning breakfast recipe how to make soya poha home

पोहे ही एक अशी डिश आहे, जी सर्वांना खुप आवडते. इंदूर आणि महाराष्ट्रात लोकांना तांदळाचे पोहे खायला आवडतात. पण, तुम्ही 'सोया पोहे' कधी ट्राय केले आहे का? इतर पोह्यांपेक्षा हे आरोग्यदायी आणि चविष्ट आहे.

जर तुम्हाला सकाळी नाश्त्यात काहीतरी नवीन करून पहायचे असेल तर तुम्ही हे चवदार सोयापोहे अगदी सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया सोया पोहे कसे बनवायचे.

  • सोयापोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मिनी सोया - 30 ग्रॅम

पोहे- 200 ग्रॅम

वाटाणे - 20 ग्रॅम

बीन्स - 20 ग्रॅम

तेल - 1 चमचा

कढीपत्ता - 5-6 पाने

हिरवी मिरची - 2 तुकडे

आलं - एक चिमूटभर

कांदा - 1 बारीक चिरून

धणे - 2 चमचे बारीक चिरून

लिंबाचा रस - 2 चमचे

मीठ - चवीनुसार

टोमॅटो- १ बारीक चिरलेला

मोहरी - एक चिमूटभर

Soya Poha Recipe
Mango Recipes: आंब्यापासून बनवा 'हे' 4 चटकमटक पदार्थ

सोयापोहे बनवण्याची कृती

स्टेप 1

सर्वात आधी सोया आणि पोहे वेगळ्या भांड्यात काढून पाण्यात भिजत ठेवावे.

स्टेप 2

त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, आलं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला.

स्टेप 3

थोड्या वेळाने त्याच पॅनमध्ये टोमॅटो आणि कांदे घाला, नंतर शिजल्यानंतर वाटाणे आणि सोयाबीन घाला.

स्टेप 4

थोडा वेळ गॅसवर शिजवून घ्या, 5 मिनिटांनी त्यात भिजवलेले पोहे आणि सोया घाला आणि चांगले मिक्स करा आणि थोडा वेळ शिजू द्या.

स्टेप 5

10 मिनिटांनंतर ते एका प्लेटमध्ये काढून त्यावर लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com