National French Toast Day : फ्रेंच टोस्ट डेच्या निमित्ताने खास बनवा फ्रेंच टोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National French Toast Day

National French Toast Day : फ्रेंच टोस्ट डेच्या निमित्ताने खास बनवा फ्रेंच टोस्ट

National French Toast Day : दरवर्षी 28 नोव्हेंबर रोजी, संपूर्ण युनायटेड स्टेट्समधली म्हणजेच अमेरिकेमधली लोक राष्ट्रीय फ्रेंच टोस्ट दिवस साजरा करतात. तसा हा दिवस सुरू कधीपासून झाला याविषयी जरा संभ्रम आहे. पण आपल्या प्रियजनांना बोलावून एकाच डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत दिवस साजरा करण्याचं सुख दुसऱ्या कशातच नाही.

हेही वाचा: French Fries Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट सारखे फ्रेंच फ्राईज

अमेरिकन याला फ्रेंच टोस्ट म्हणत नाहीत. याला "पेन परडू" किंवा "लॉस्ट ब्रेड" असे म्हणतात कारण ते बनवण्यासाठी तुम्ही अक्षरशः शिळा ब्रेडही वापरू शकता. फ्रेंच टोस्ट, फ्रेंच भाषेनुसार, अन्न वाया न घालवण्याच्या इच्छेने तयार झालेला पदार्थ आहे. बहुतेक तज्ञ म्हणतात की फ्रेंच टोस्ट खाण्याची सुरुवात प्राचीन रोमपासून सुरू झाली. रोमन लोकांनी ब्रेडचे तुकडे तळण्याआधी काहीवेळ ते दुधाच्या आणि अंड्याच्या मिश्रणात बुडवले आणि त्याला "पॅन डुलसीस" असे नाव दिले.

हेही वाचा: Successful Parenting Tips : आदर्श पालकांमध्ये आढळतात या 3 गोष्टी; तुम्हीही करा या गोष्टींचे अवलंबन

इतिहासकारांचा अस म्हणणं आहे की “फ्रेंच” या शब्दाचा अर्थ फ्रान्स असा नाही; ते, ते "फ्रेंच" या क्रियापदाचा संदर्भ देते ज्याचा अर्थ जुन्या आयरिशमध्ये "तुकडे करणे" असा होतो. यूएस आणि कॅनडामध्ये प्रवास करणाऱ्या आयरिश मधल्या लोकांनी त्यांच्यासोबत हा शब्द आणला असावा.

हेही वाचा: Startup Success Story : या ध्येयवेड्यांनी इंजिनीअरींग सोडून काढली भंगार गोळा करण्याची कंपनी; वर्षाचा टर्नओव्हर आहे १० कोटी

“फ्रेंच टोस्ट” हा वाक्प्रचार प्रथम 1871 मध्ये द एन्सायक्लोपीडिया ऑफ अमेरिकन फूड अँड ड्रिंकमध्ये दिसला. पण तेव्हा, तत्सम रेसिपीजला “एग टोस्ट,” “स्पॅनिश टोस्ट” आणि अगदी “जर्मन टोस्ट” असेही म्हणतात.

हेही वाचा: Womens Success Story : युनिसेफची नोकरी सोडून तिने सुरू केली शूज लॉन्ड्री; आज आहे लाखोंचा टर्नओव्हर

तर बघुयात अशा फ्रेंच टोस्टची रेसिपी

साहित्य:

- 6 ब्रेड स्लाइस

- 3 अंडी

- 1 कांदा

- 2 हिरव्या मिरच्या

- कोथिंबीर

- मीठ चवीनुसार

- बटर गरजेनुसार

हेही वाचा: Sucess Story : फक्त दहा मिनिट पाणी देऊन, दोनच महिन्यात पिकवली सात किलो वजनाची कंलिगड

कृती:

- स्टेप 1

कांदा अगदी बारीक चिरून घ्या. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

- स्टेप 2

एका वाडग्यात कांदा, मिरची, कोथिंबीर घालून त्यात अंडी फोडून घाला आणि मीठ घालून एकजीव करून घ्या.

- स्टेप 3

ब्रेड स्लाइस त्रिकोणी कापून घ्या. पॅन तापायला ठेवून त्यात बटर घाला. ब्रेड स्लाइस मिश्रणात भिजवून पॅनमध्ये दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

- स्टेप 4

गरम गरम टोस्ट टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.