Office Energy Snacks : ऑफिसमध्ये दुपारनंतर एनर्जी होते डाऊन; हे स्नॅक्स करतील मदत

ऑफिसमध्ये काम करताना खाण्यासाठी घरगुती आरोग्यदायी स्नॅक्स
Office Energy Snacks
Office Energy Snacksesakal

Healthy Snacks For Office : ऑफिसमध्ये सकाळपासून दुपारपर्यंतचा वेळ फ्रेश वाटते. पण, दुपारच्या जेवणानंतर थोडा आळस यायला लागतो. त्याचे कारण म्हणजे एकतर भूक लागलेली असते. किंवा झोप आलेली असते. अशावेळी पिझ्झा, बर्गर, चहा, कॉफी असे जंक फूड खाल्ले जातात. आणि शरीराला त्याचे परिणाम भोगावे लागतात.

Office Energy Snacks
Energy Tips : वयाच्या चाळीशीतही हवा असेल विशीतला उत्साह तर हे पदार्थ टाळा

ऑफिसमध्ये काम करताना खाण्यासाठी घरगुती आरोग्यदायी स्नॅक्स तुम्हाला फ्रेश करतात. अशावेळी चहा किंवा कॉफीसोबत काही छोटे स्नॅक्स तूम्हाला एनर्जी देतात. जाणून घेऊयात अशा स्नॅक्सबद्दल.

Office Energy Snacks
Evening Snacks : संध्याकाळी खाण्यासाठी सर्वोत्तम स्नॅक्स कोणते?

शेंगदाणे आणि सुका मेवा

शेंगदाणे किंवा सुका मेवा कुठेही घेऊन जाणे सहज शक्य आहे. तो लवकर खराबही होत नाही. शेंगदाणे हेल्दी फॅट्स, कार्ब्स आणि प्रोटीन्स सारख्या मॅक्रोन्यूट्रिशन्सनी भरलेले असतात. त्यामुळे छोट्या भूकेसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

Office Energy Snacks
Energy Foods : महिलांनी ऊर्जा मिळवण्यासाठी खावेत हे पदार्थ

भाजलेले चणे

भाजलेले चण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर, जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. खनिज असण्याव्यतिरिक्त हे अमीनो ऍसिड देखील हरभऱ्यामध्ये असतात. हरभरे खाल्ल्याने पोट अधिकवेळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Office Energy Snacks
Papad snacks : नरम पडलेले पापड पुन्हा कुरकुरीत कसे कराल ?

ब्राऊन राइस केक आणि अॅव्होकॅडो

प्रोटीन्सने भरपूर असलेला ब्राऊन राइस केक ऑफिसमध्ये खाण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी बेस्ट ऑप्शन मानला जातो. तो आपल्या शरीरातील कार्ब्स, कॅलरीज आणि फायबरची कमतरता पूर्ण करतो. एवोकॅडो हे फायबर आणि निरोगी फॅट्सने समृद्ध असलेले एक अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. त्यामूळे तेही तूमच्या छोट्या भुकेवर रामबाण उपाय आहे.

Office Energy Snacks
Papad snacks : नरम पडलेले पापड पुन्हा कुरकुरीत कसे कराल ?

पीनट बटर आणि सफरचंद

पीनट बटरमध्ये कॅल्शिअम भरपूर असते. तर सफरचंद फायबरचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. जो पचन सुधारण्यास तसेच दिवसभर उत्साही राहण्यास मदत करतो. डॉक्टर दिवसभरात एकतरी सफरचंद खाण्यास सांगतात. त्यामूळे अनेक आजार दूर पळतात. त्यामूळे सफरचंद आणि पिनटबटर तूम्ही एकत्र खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com