पोटभर खाऊनही सतत लागतेय भूक? असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण

काही लोकांना सतत काही ना काही खाण्याची सवय असते, ते कधी जंक फूड, कधी स्नॅक्स तर कधी फळे खात असतात. अशा लोकांचे तोंड कधीच शांत राहत नाही. भरपूर खाऊन देखील त्यांना भूक लागतचं असते, परंतु असे सतत खाणे या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.
food
foodsakal

Overeating Problem : काही लोकांना सतत काही ना काही खाण्याची सवय असते, ते कधी जंक फूड, कधी स्नॅक्स तर कधी फळे खात असतात. अशा लोकांचे तोंड कधीच शांत राहत नाही. भरपूर खाऊन देखील त्यांना भूक लागतचं असते, परंतु असे सतत खाणे या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.

तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक दोन तासांनी खाण्याचा सल्ला दिला जातो. सतत खाऊनसुद्धा जर तूम्हाला भूक लागत असेल तर हे गंभीर आजारचे लक्षण असू शकते. याकडे दूर्लक्ष न करता वेळेत उपचार करायला हवेत. सारखी भूक लागत असेल तर त्यामागे काही कारणे असू शकतात, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

१. मधुमेह

दिवसभर सतत भूक लागण्यामागे मधुमेह हे एक कारण असू शकते. मधुमेह झाल्यानंतर ग्लूकोज संपूर्ण शरीरात पुर्णपणे पसरत नाही, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सारखी भूक लागत असते. जर तुम्हाला सतत भूक लागत असेल तर ते मधुमेह होण्याचे संकेत असू शकतात.

२. जास्त ताण घेणे

काही लोकांना जास्त ताण आल्यानंतर सुद्धा भूक लागते. जास्त तणाव घेतल्याने तब्बेत बिघडू शकते. ताण-तणावामुळे आपल्या शरीरात बरेच हार्मोन्स रिलीज होत असतात, जे भूक वाढवत असतात. अशातच सारखं सारखं काही ना काही खावसं वाटतं, त्यामुळे आपण कधी कधी ओव्हर ईटींग करत असतो.

food
Weight Gain Food : मुलं खातात व्यवस्थित पण त्यांच वजनच वाढतं नाही? डॉक्टर सांगतात की...

३. जास्त व्यायाम करण्याची सवय

तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजेल, परंतु तो किती प्रमाणात करावा यालासुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळे जास्त व्यायाम केल्यानेही तब्बेत बिघडू शकते. जास्त व्यायाम केल्यानंतर शरीरातील जास्त कॅलरीज खर्च होतात, ज्यामुळे सारखी भूक लागण्याची समस्या वाढू शकते. तसेच जास्त व्यायाम करुन मेटाबाॅलिज्म फास्ट होतात आणि त्यामुळे लवकर भूक लागू शकते.

४. मैद्याचे पदार्थ खाणे

आजकाल जवळपास सर्वजण मैद्यापासून बनलेले पदार्थ खातात. मैद्यामध्ये प्रोटीन, व्हिट्यामिन आणि मिनरल्स खुप कमी प्रमाणात असतात, त्यामूळे पोट भरत नाही. मैद्याचे पदार्थ खाल्यानंतर पोट एकदम भरते परंतु काही वेळानंतर लगेचच भूक लागते, त्यामुळे भूक वाढण्याचं मैदा खाण हे सुद्धा कारण असू शकतं.

५. झोप पूर्ण न होणे

जर तुम्ही वेळेवर झोपत नसाल आणि तुमची झोप पूर्ण होत नसेल तरी तुम्हाला जास्त भूक लागू शकते. त्यामुळे तुम्ही तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ बदलायला हवी आणि पुरेपूर झोप घ्यायला हवी.

food
Stamina Boost Foods : स्टॅमिना वाढवण्यासाठी आहारात 'या' खाद्यपदार्थांचा करा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com