Weight Gain Food : मुलं खातात व्यवस्थित पण त्यांच वजनच वाढतं नाही? डॉक्टर सांगतात की...

मुलांच्या वजन वाढविण्यासाठी सप्लिमेंट, टॉनिक नाहीतर आहारच सर्वाधिक महत्वाचा आहे
Weight Gain Food
Weight Gain Foodesakal

Weight Gain Food :

लहान मुलांच्या कमी वजनावरून अनेकवेळा त्यांच्या मातांना ऐकून घ्यावे लागते. मुलं किती बारीक झालंय, त्याच्या अंगात ताकद नाही, यावरून अनेक टोमणेही आईला मारले जातात. ती समोरील मुलगी बघ त्याच्याच वयाची आहे पण वजन काय आहे तिचं. तिची आई जास्त काळजी घेते, अशी उदाहरणेही दिली जातात.

बाळाचं वजन वाढावं म्हणून त्याने पोटभर जेवलं पाहिजे, ड्रायफ्रूट्स, फळे खाल्ली पाहिजेत असे आईला वाटते. पण तसे त्या बाळालाही वाटायला हवं, कारण, मुलं जेवत नाहीत, खात नाहीत अशी सतत तक्रार माता डॉक्टरांकडे करत असतात.   

Weight Gain Food
Child Trafficking Case: दिल्लीत बाल तस्करी प्रकरण उघड! CBI छाप्यादरम्यान अनेक बालकांची सुटका...

डॉक्टरांचा लाखमोलाचा सल्ला

सांगलीतील श्री समर्थ बाल रूग्णालयातील डॉ. प्रशांत देशमुख (M.B.B.S DCH) सांगतात की, बाळाचे वजन वाढण्यासाठी पूर्ण संतुलित आहार महत्वाचा आहे. वरील डाएट चार्ट दिलेला आहे तो योग्यच आहे. आहारात योग्य प्रमाणात कार्बहायड्रातेस प्रथीने आणि मेद असणे महत्वाचे असते. परंतु त्याचबरोबर व्हिटॅमिन्स मिनराल्स वाढीसाठी गरजेचे आहेत.

आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेल्या मुलांना ज्याची वाढ योग्य होत नाही अश्या मुलांना सप्लिमेंट्स म्हणून व्हिटॅमिन्स कॅलसिअम आयर्न अप्पेटीसर्स देतो. त्याबरोबर वजन वाढीसाठी आहार महत्वाचा आहे. सप्लिमेंट्समुळे वजन वाढत नाही ते फक्त डाएटरी सप्लिमेंट म्हणून काम करते.

पुढे ते असेही म्हणाले की, भुकेचे टॉनिक्स केवळ पालकांच्या आग्रहास्तव देतो. त्याबरोबर डाएटरी सल्ला देतो. तो पुर्ण केला तर निश्चितच वजन वाढते. टॉनिकने कंपन्या मोठ्या होतात मुलं नाही. मुलांच्या वजन वाढविण्यासाठी आहारच महत्वाचा आहे.

Weight Gain Food
Weight Gain Tips : बारीक लुकड्या शरीराला डौलदार बनवा, वजन वाढवायला असं करा केळीचं सेवन!

मुलांच्या आहारात हे पदार्थ द्या

रोजचे पदार्थ

सोयाबीन - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्या प्रोटीन्सच्या मदतीने मुलांचे वजन वाढण्यास मदत होते. जी मुले रोजच्या भाज्या खात नाहीत त्यांना सोयाचंकचे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ह देऊ शकता.  

डाळ – लहान मुलांना गावात असलेल्या अंगणवाडीत काही पदार्थ डाळ, गहू, हरभरा मिळतो. त्यांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. कारण सालासकट असलेली मुगाची डाळ मुलांचे वजन वाढवायला मदत करते. तसेच, घरातील इतर डाळींपासून बनवलेला डोसा, आप्पे हेही मुलांसाठी पौष्टिक ठरतात.

भात - मुलांनी चपाती भाकरी खाल्ली नाहीतर त्यांना वरण-भात दिला जातो. भातात कार्बोहायड्रेट अधिक असते ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

Weight Gain Food
Weight Gain Facts : सडपातळ असलेल्या मुलींचं वजन लग्नानंतर का वाढतं? ही आहेत खरी कारणं

दुधाचे पदार्थ

चीज - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.

फुल क्रीम मिल्क - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

फळे

केळी - पोट भरणारे फळ म्हणून केळीला ओळखलं जातं. ती पोट भरते तसे वजनही वाढवते. कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

चिकू शेक - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.

Weight Gain Food
Foods For High BP : उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' खाद्यपदार्थ, हृदय ही राहील निरोगी

मांसाहारी पदार्थ

अंडी,मटण आणि मासे लहान मुलांना देणे फायद्याचे ठरते. कारण, अंड्यामध्ये प्रोटीन असते. तर मटणामध्ये प्रथिने तुमच्या मुलांचे वजन लवकर वाढवण्यास मदत करतात. तसेच,माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.

Weight Gain Food
Jalgaon Child Marriage : बहिण, मेहुण्याने लावला अल्पवयीन मुलीचा विवाह; ‘डायल 112’वरून तत्पर मदत

मुलांना यापासून दूर ठेवा

बिस्कीट, केक, पाव, पेढा, बर्फी, फरसाण, कुरकुरे, मॅग्गी, चॉकलेट्स, गोळ्या अश्या प्रकारचे वरचे खाणे बंद करायला पाहिजे. तसेच, मैद्याचे पदार्थ टाळले पाहिजेत, यामुळे काय होते पोट साफ होत नाही भूक लागत नाही भूक मरते, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com