
पाणीपुरीचे पाणी प्यायल्याने वजन होते कमी!
panipuri for weight loss : पाणीपुरीचे नाव जरी उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. दिवसातल्या कुठल्याही वेळी पाणीपुरी सहज खाता येते. पाणीपुरी टेस्टी आहे की नाही हे त्याच्या तिखट-गोड पाण्यावरून लक्षात येते. हे पाणी जर परफेक्ट जमले तर तुमची पाणीपुरी बेस्ट झालीच म्हणून समजा. कधीही केव्हाही खाता येणारी पाणीपुरी म्हणूनच तर लोकप्रिय आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने अनेक लोकं पाणीपुरी खाणे टाळतात. बाहेर तर ते अजिबात खात नाहीत. पण पाणीपुरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचे वजन यामुळे कमी (Weight Loss) होऊ शकते. तुम्हाला बाहेरची आवडत नसेल तर तुम्ही घरी करा, पण पाणीपुरी खा! कारण घरी पाणीपुरी केल्याने पौष्टीकमूल्य अधिक वाढते.
हेही वाचा: ओट्स की कॉर्न फ्लेक्स! नाश्त्यासाठी योग्य पौष्टीक पर्याय कोणता?
पाणीपुरी खाल्ल्याने होतात हे फायदे
१) वजन कमी करायचे असेल तर पाणीपुरी हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही डाएट करत असाल तर एक प्लेट पाणीपुरी खा. पण पाणी जास्त प्या! पाणीपुरीचे पाणी अत्यंत गरम आणि मसालेदार असल्याने, ते प्यायल्याने तुमची भूक कमी कमी होते. परिणामी वजनही कमी होते.
२) पाणीपुरीच्या पाण्यात अनेक मसाले असतात. तुम्हाला जर तोंडात फोड आले असतील हे पाणी प्यायल्याने फोड कमी होण्यास मदत मिळू शकते.
पाणीपुरीचे पाणी अनेक मसाल्यांनी बनवले जाते आणि जर तुम्हाला तोंडाच्या फोडांचा त्रास होत असेल तर ते फायदेशीर ठरू शकते.
३) तुम्हाला कोणत्यातरी कारणाने निराश वाटत असेल, मळमळ, चिडचिड होत असेल, मूड बदलत असेल तर पाणीपुरी खाल्ल्याने लगेचच तुम्हाला तरतरी येईल.
४) काही आहारतज्ज्ञ थकवा कमी करणे तसेच वजन कमी करण्यासाठी घरी पाणीपुरी खाण्याचा सल्ला देतात. घरी पाणीपुरीची पुरी केल्यास ती कमी तेलात तळता येते. तुम्हाला आरोग्याचे अधिक फायदे हवे असतील तर,तुम्ही पाणीपुरीसोबत जिऱ्याचे पाणी वापरू शकता.
५) पाणीपुरीच्या पाण्यात पुदिना, जिरं, हिंग असते. त्यामुळे जळजळ कमी होते. शिवाय मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. मात्र पाणीपुरीची गोड चटणी खाऊ नका. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
हेही वाचा: ३ सेकंद व्यायाम केल्याने वाढते स्नायूंची ताकद, अभ्यासात स्पष्ट
Web Title: Panipuris Can Be Part Of Your Weight Loss Diet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..